‘अंतरपाट’ मधील गौतमी-क्षितिजच्या लग्नाचा महासप्ताह; कलाकारांच्या लूकने लक्ष वेधलं

Antarpath Serial Wedding week : सध्या मराठी मालिकांची प्रेक्षकांच्या मनावर पकड आहे. कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' ही मालिकादेखील प्रेक्षकांना पाहायला आवडते. या मालिकेत सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. लग्नाच्या महासप्ताह गौतमी-क्षितिजचा लूक लक्षवेधी ठरतो आहे.

'अंतरपाट' मधील गौतमी-क्षितिजच्या लग्नाचा महासप्ताह; कलाकारांच्या लूकने लक्ष वेधलं
अंतरपाट मालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 2:00 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका ‘अंतरपाट’ ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतेय. रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. तुम्ही मालिकेत रश्मी अनपट आणि अशोक धगे हे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. या लग्नाचा सिक्वेन्स शूट झाला आहे. यात गौतमी आणि क्षितिज म्हणजेच रश्मी अनपट आणि अशोक धगे यांच्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसांआधी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गौतमी आणि तिच्या परिवाराने बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण केली. त्यानंतर त्या दोघांचे केळवण अगदी छान पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पडले.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

या सगळ्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्न म्हणजे एक संस्कार… आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणता येईल. असा महत्वाचा विधी ज्यामध्ये विविध पद्धतीच्या विधी आणि त्यातून झळकणारे वेगळेपण आपल्याला दिसत असते. पण आजकालच्या चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव जपणारे  परंपराची उजळणी करून देणारे एक साधे सोज्वळ पण तितकेच सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.

गौतमी- क्षितिज यांचा विवाह विधी एखाद्या हॉलमध्ये न करता अत्यंत सुंदर वेगळेपणा देणाऱ्या वाड्यात पार पडणार आहे. या वाड्यात झगमगती रोषणाई आणि सजावट न करता महाराष्ट्रीय संस्कृतीत महत्वाचे मानले जाणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजावट केली आहे. या शिवाय रांगोळी, फुलांची सजावट तसेच मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणचा आनंद मिळावा, म्हणून वेलकम ड्रिंकमध्ये कोकणी शहाळ्याचे पाणी , कोकम सरबत आणि पन्हं दिले आहे.

येणाऱ्या पाहुण्यांना मोदक ते देखील अस्सल तुपाची धार सोडून देणार. शिवाय हे सगळे जेवण केळीच्या पानात दिले जाणारे आहे आणि या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.