Bharti Singh: ‘मुलगा झाला!’ कॉमेडियन भारतीच्या पतीनं दिली खूशखबर, कसे आहेत बाळ-बाळंतीण?

Bharati Singh: आज भारतीनं आपल्या इन्टाग्राम पोस्टवरुन आपण आई झाल्याची खूशखबर आपल्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे. नवव्या महिन्यातही शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या भारतीबाबत दोन दिवसांपूर्वीच एक अफवा पसरली होती.

Bharti Singh: 'मुलगा झाला!' कॉमेडियन भारतीच्या पतीनं दिली खूशखबर, कसे आहेत बाळ-बाळंतीण?
भारती आणि हर्षच्या घरात नव्या पाहुण्याची इन्ट्री!Image Credit source: instagram/bharti.laughterqueen
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 7:07 PM

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहच्या (Bharati Singh) पतीनं सगळ्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. भारतीला मुलगा झाला असून रविवारी तिची प्रसूती झाली असल्याचं भारतीच्या पतीनं सांगितलंय. इन्स्टाग्रावर पोस्ट (Instagram Post) करत भारतीचा पती हर्ष लिंबाचियानं ही गूडन्यूज सगळ्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीची डिलीव्हरी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यानंतर खुद्द भारतीला लाईव्ह येत या सगळ्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती. डिलीव्हरी झाल्यानंतर आम्ही स्वतःहून त्याची माहिती आमच्या सोशल मीडियावरुन देऊ, असं भारतीनं आपल्या चाहत्यांनी उद्देशून म्हटलं होतं. अखेर भारतीनं रविवारी एक गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हर्षनं (Harsh Limbachiya) भारतीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही बातमी सगळ्यांना दिली आहे. यानंतर चाहत्यांनीही भारती आणि हर्षवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी भारतीच्या इन्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्यात.

सेलिब्रिटिंगकडून शुभेच्छांचा वर्षाव!

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसह राहुल वैद्यनंही भारती आणि हर्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी भारतीनं आपल्या इन्टाग्रावरुन येणाऱ्या मुलाची आई, असं कॅप्शन करत फोटो पोस्ट केले होते.

इतकंच काय, तर होळीला हर्ष आणि भारतीनं बेबी बंप फोटो सेशनही केलं होतं आणि आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.

गरोदरपणाही सुरु होतं शुटिंग

दरम्यान, हुनरबाज शोसाठी एन्करींग करणारी पहिली गरोदर सूत्रसंचालक असल्याचा दावाही भारतीनं जानेवारीमध्ये केला होता. त्यानंतर काहींनी तिला काळजी घेण्याच्या सूचनाही केलेल्या. आपल्या तब्बेतीची काळजी घेत काम रण्याचा सल्ला तिला अनेकांनी दिला होता. पण कामाप्रती असलेल्या पॅशनमुळे तिनं गरोदरपणातही काम करण्याचा निर्णय घेतला होता. अनेकांची तिच्या या निर्णयाचं स्वागतही केलं होतं. मात्र तिला काळजी घेण्यासाठीही सूचवलं होतं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अफवेनं चर्चांना उधाण, पण…

अखेर आज भारतीनं आपल्या इन्टाग्राम पोस्टवरुन आपण आई झाल्याची खूशखबर आपल्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे. नवव्या महिन्यातही शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या भारतीबाबत दोन दिवसांपूर्वीच एक अफवा पसरली होती. भारतीनं एका मुलीला जन्म दिला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अखेर ही बातमी खोटी असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. आता खरोखरच भारती आई झाली असून हर्ष आणि भारती यांच्या घरात एका गोंडस मुलाची इन्ट्री झाली आहे.

दरम्यान, आता आई झाल्यामुळे भारतीला लगेच काही कामावर जाता यायचं नाही. त्यामुळे आगामी शोमध्ये तिची जागा कोण घेणार, याची उत्सुकताही सगळ्यांना असणार आहे.

मनोरंजन विश्वातील इतर बातम्या :

Vicky-Katrina: ‘Location तरी सांगा’; विकी-कतरिनाचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’

Tu Tevha Tashi: अभिनयावरील प्रेमापोटी सोडली नोकरी; रिॲलिटी शोमध्येही कमावलं नाव

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.