Devmanus 2: ‘देवमाणूस २’मध्ये अजितकुमारशी जुगलबंदी करण्यासाठी येणार ‘हा’ अभिनेता

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पाहिला. पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Devmanus 2: 'देवमाणूस २'मध्ये अजितकुमारशी जुगलबंदी करण्यासाठी येणार 'हा' अभिनेता
Kiran GaikwadImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 2:30 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्वदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पाहिला. पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता मार्तंड जामकर यांची एण्ट्री होणार आहे. (Marathi Serial)

अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतील. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्यामुळे आता देवमाणूस या मालिकेत एका रंजक वळणावर मिलिंद शिंदेची मार्तंड जामकर ही भूमिका पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मार्तंड जामकरमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार, अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

या भूमिकेबद्दल बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले, “देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय आहे आणि या मालिकेतील अजितकुमारची व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. या पर्वात मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मी साकारतोय याचा मला खूप आनंद आहे. याआधी देखील प्रेक्षकांनी माझ्या सर्व भूमिकांना डोक्यावर उचलून धरलं त्यामुळे ही भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल.”

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.