AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse Kirit Somaiya Video: जेव्हा खडसे आणि सोमय्या गायला लागले, ए दोस्ती हम नही छोडेंगे!

सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातली कुरघोडी आणि खणाखणी उभा महाराष्ट्र पाहतोय. अन् त्यातही चक्क राष्ट्रवादीचे नाथाभाऊ आणि भाजपचे किरीटभाई मात्र, ए दोस्ती हमी नही छोडेंगे असे हातात हात घालून म्हणतायत. त्यावर टाळ्यांचा गजर मिळवतायत. तुमचा विश्वास बसत नसला, तरी हे खरे आहे.

Eknath Khadse Kirit Somaiya Video: जेव्हा खडसे आणि सोमय्या गायला लागले, ए दोस्ती हम नही छोडेंगे!
झी मराठीच्या किचन कल्लाकार कार्यक्रमाच्या सेटवर नाथाभाऊ आणि किरीटभाईंची जुगलबंदी रंगली.
| Updated on: Apr 14, 2022 | 1:27 PM
Share

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून आरोपांची राळ उडवून देणारे आणि सध्या आयएनएस विक्रांत प्रकरणात चर्चेत असलेले भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दोघांनी मिळून दोस्तीच्या आणाभाका घेतल्या, तर कोणी विश्वास ठेवेल. राजकारण म्हणून याकडे पहाल, तर नक्कीच नाही. सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातली कुरघोडी आणि खणाखणी उभा महाराष्ट्र पाहतोय, पण त्यातही हे दोघे मात्र, ए दोस्ती हमी नही छोडेंगे म्हणतायत. त्यावर चक्क वन्स् मोरच्या टाळ्यांचा गजर मिळवतायत. तुमचा विश्वास बसत नसला, तरी हे खरे आहे. कितीही मनभेद आणि मतभेद असू द्या, राजकारणच्या पलीकडचे एक मैत्र असते. त्याचेच उदाहरण नाथाभाऊ-किरीटभाईंनी येथे दाखवून दिले. नेमके हे प्रकरण काय, या दोघांचे इतके गुळपीठ कुठे जमले, चला तर मग हे जाणून घेऊयात.

किचन कल्लाकारच्या कट्ट्यावर…

सध्या झी मराठीवर वाहिनीवर किचन कल्लाकार नावाचा एक कार्यक्रम चोखंदळ रसिकांची दाद मिळवतोय. त्याच-त्याच रटाळ मालिका पाहून कंटाळा आलेल्यांचा इथे हमखास विरुंगळा होतो. मग कधी चक्क नागराज मंजुळेसह झुंडची टीम येथे येते. तर कधी रोहित पवार, पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांच्या गप्पांचा फडही येथे रंगतो. निमित्त असते, एखादा झक्कास मराठी पदार्थ करण्याचे. मग यावेळी नेहमी चर्चेत असणाऱ्या या व्यक्तींचे राजकरणातले आणि बाहेरचेही एक वेगळे जग आपसूकच आपल्याला कळते. तसेच नाथाभाऊ आणि किरीटभाईंबद्दल झाले.

राजकारण गेले चुलीत…

किचन कल्लाकार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे हा गुणी अभिनेता करतो. तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले परीक्षक अर्थातच महाराजाच्या भूमिकेत असतात. या कार्यक्रमात नाथाभाऊ आणि किरीट भाईंना गाजलेल्या शोले या चित्रपटातले ए दोस्ती…हे गाणे म्हणायला सांगण्यात आले. तेव्हा त्यांनीही राजकारण गेले चुलीत म्हणत हातात हात घेत सुरावर ठेका धरला आणि ए दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे…हे गाणे जोरकसपणे सादर केले.

अन् महाराजांनी घेतला धसका…

नाथाभाऊ आणि किरीटभाईंच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. रसिकांनी वन्समोरची मागणी केली. यावेळी गेल्या चार महिन्यांपासून एकदाही वन्समोरची मागणी रसिकांनी केली नसल्याची आठवण संकर्षणने करून दिली. तेव्हा प्रशांत दामले यांनी आपली घरी जायची लाइन आली असल्याचे सांगितले. यावर सोमय्यांनी मिश्कील टिप्पणी करत, तुमची घरी जायची लाईन की, आम्हाला घरी पाठवायचा प्रयत्न करताय, असे म्हणताच एकच खसखस पिकली.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.