Swayamvar Mika Di Vohti: मिका सिंगच्या स्वयंवरसाठी उभारला भव्य सेट; खर्च केले तब्बल इतके रुपये
'स्वयंवर-मिका दी वोटी'च्या संपूर्ण सेटचे अचूक शॉट्स घेण्यासाठी 7 ते 8 ड्रोन्सचा वापर केला जात आहे. उम्मीद जोधपूर पॅलेस रिसॉर्ट आणि स्पा या ठिकाणी सेट उभारण्यात आाल आहे.
स्टार भारत या वाहिनीवर लवकरच ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम सुरू होणार आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) त्याच्या आयुष्याची जोडीदार शोधण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. या शोच्या शूटिंगची सुरुवात जोधपूर शहरात झाली असून त्यासाठी अत्यंत भव्यदिव्य आणि अतिशय सुंदर सजवलेल्या सेट (Grand Set) उभारण्यात आला. कला दिग्दर्शन टीमने अनेक डिझाइन्स लक्षात घेऊन हा सेट तयार केला आहे. या सेटसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शोची जोरदार चर्चा आहे. याआधीही काही कलाकारांनी अशा शोच्या माध्यमातून स्वयंवर केलं होतं.
‘स्वयंवर – मिका दी वोटी’ या शोच्या कला दिग्दर्शन टीमने त्यांच्या सेट्ससाठी वेगवेगळ्या डिझाईन्ससह परिपूर्ण थीम जुळवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. या सेटला स्वयंवरची अनुभूती देण्यासाठी पारंपारिक टच देण्यात आला आहे. या सेटवर निर्मात्यांनी जवळपास 75 लाख रुपये खर्च केले आहेत. एवढेच नाही तर ‘स्वयंवर-मिका दी वोटी’च्या संपूर्ण सेटचे अचूक शॉट्स घेण्यासाठी 7 ते 8 ड्रोन्सचा वापर केला जात आहे. उम्मीद जोधपूर पॅलेस रिसॉर्ट आणि स्पा या ठिकाणी सेट उभारण्यात आाल आहे. या शोचा प्रीमियर 19 जून रोजी रात्री 8 वाजता स्टार भारतवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या शोमध्ये एकून 12 स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यापैकी एकीशी तो लग्नगाठ बांधणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक शान या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. मिका खऱ्या आयुष्यात कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे तो प्रेक्षकांना समजावून सांगणार आहे. “मी माझी ड्रीम गर्ल शोधण्यासाठी खूपच उत्सुक आहे. आजपर्यंत मी दुसऱ्यांच्या लग्नात भांगडा केला होता, आता माझी वेळ आली आहे. स्टार भारतने जेव्हा माझ्याकडे या शोचा प्रस्ताव आणला, तेव्हा हे माझ्या नशिबातच लिहिलंय असं मला वाटलं”, अशी प्रतिक्रिया मिका सिंगने दिली. जवळपास 14 वर्षांनंतर स्वयंवरचा हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.