Happy Birthday Raju Srivastav | अभिनयाच्या वेडापायी मुंबईत आला, आर्थिक तंगीत रिक्षा चालवली अन् एका प्रवाशामुळे बदललं राजू श्रीवास्तवचं नशीब!

जेव्हा स्टँड अप कॉमेडियनची चर्चा होते तेव्हा लोकांना कपिल शर्मा, सुदेश लाहिरी, भारती सिंग अशी अनेक नावे आठवतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात झाली ती प्रेक्षकांच्या हृदयात घर केलेल्या एका कलाकारामुळे, आज हा काळकर 58वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Raju Srivastav | अभिनयाच्या वेडापायी मुंबईत आला, आर्थिक तंगीत रिक्षा चालवली अन् एका प्रवाशामुळे बदललं राजू श्रीवास्तवचं नशीब!
Raju Shrivastav (Photo : Twitter)
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:45 AM

मुंबई : जेव्हा स्टँड अप कॉमेडियनची चर्चा होते तेव्हा लोकांना कपिल शर्मा, सुदेश लाहिरी, भारती सिंग अशी अनेक नावे आठवतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात झाली ती प्रेक्षकांच्या हृदयात घर केलेल्या एका कलाकारामुळे, आज हा काळकर 58वा वाढदिवस साजरा करत आहे. हो, आम्ही लोकांच्या आवडत्या ‘गजोधर भैया’ बद्दल बोलत आहोत, म्हणजेच राजू श्रीवास्तवबद्दल (Raju Srivastav), ज्यांनी आपल्या शानदार स्टँड अप कॉमेडीने लोकांना खूप हसवले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

राजू यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरमध्ये झाला. त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश असे होते, पण आज जग त्यांना राजू श्रीवास्तव या नावाने ओळखते. लोकांसमोर बोलण्याची कला राजूला त्याच्या वडिलांकडून मिळाली आहे. त्यांचे वडील कानपूरचे लोकप्रिय कवी होते आणि ते त्यांच्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे, पण राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचे होते.

‘गजोधर भैय्या’ प्रेक्षकांच्या पसंतीस!

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवले. या शोमध्ये ‘गजोधर भैय्या’ हे रनरअप ठरले असले, तरी प्रेक्षकांनी त्यांना ‘द किंग ऑफ कॉमेडी’ ही पदवी दिली होती.

आपल्या कॉमेडी शोच्या या संघर्षाबद्दल बोलताना राजू म्हणतात, ‘मी मुंबईत आलो तेव्हा लोक कॉमेडियनला मोठा कलाकार मानत नव्हते. त्याकाळात विनोद फक्त जॉनी वॉकरपासून सुरू झाला आणि जॉनी लीव्हरवर संपला. तेव्हा स्टँड-अप कॉमेडीला जागा नव्हती, त्यामुळे मला हवी ती जागा मिळाली नाही.’

उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली!

विनोदी कलाकार होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या राजूलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईसारख्या शहरात घरून पाठवलेला पैसा कमी पडायचा. अशा परिस्थितीत स्वतःचा खर्च उचलण्यासाठी राजूने ऑटोही चालवली. या दरम्यान त्याला कधी-कधी शोही यायचे. राजूचे स्वप्न पूर्ण व्हायचे होते आणि अशा परिस्थितीत राजूला एका प्रवाश्याच्या ओळखीने एक मोठा ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

मात्र, हळुहळू त्यांनी कॉमेडीत आपला ठसा उमटवला आणि आजमितीला त्यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. राजू बिग बॉसचाही भाग बनले होता. तो शो जिंकू शकला नाही पण प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. याशिवाय राजू यांनी राजकारणातही प्रवेश केला. राजू यांनी समाजवादी पक्ष सोडल्यानंतर भाजपची निवड केली. मात्र, त्यांच्यातील विनोदवीर कधीच संपला नाही आणि ते राजकारणाच्या रंगातही रंगू शकले नाहीत.

हेही वाचा :

हवाई सफारीमध्ये हरवून जा भारतीय संगितात, विमानतळावरही ऐकू येईल अभिजात भारतीय संगीत!

शिवराज अष्टकातील तिसरं पान उलगडणार बाजीप्रभूंचा इतिहास! ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा चिन्मय शिवरायरूपात!

Today Release Films | शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! रणवीरच्या ‘83’पासून ते साराच्या ‘अतरंगी रे’पर्यंत अनेक चित्रपट-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला!

Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!  

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.