Indian Idol 12 | आशिष कुलकर्णीचं गाणं ऐकून अनु मलिकने पकडले कान, पाहा पुढे काय झालं…

सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12' (India Idol 12) प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक खास भाग घेऊन येतो. या आठवड्यात इंडियन आयडॉलचा किशोर कुमार विशेष भाग असणार आहेत.

Indian Idol 12 | आशिष कुलकर्णीचं गाणं ऐकून अनु मलिकने पकडले कान, पाहा पुढे काय झालं...
आशिष कुलकर्णी -अनु मलिक
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 12:44 PM

मुंबई : सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12′ (India Idol 12) प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक खास भाग घेऊन येतो. या आठवड्यात इंडियन आयडॉलचा किशोर कुमार विशेष भाग असणार आहेत. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार गांगुली यावेळी शोमध्ये येणार असून, स्पर्धकांना प्रोत्साहित करताना दिसणार आहेत. या आठवड्यात अनु मलिकही (Anu Malik) येणार आहे. शोमध्ये सध्या इंडियन आयडॉल 12ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस लागली आहे. या आठवड्यात, स्पर्धक आशिष कुलकर्णी (Aashish Kulkarni) याच्या गाण्याने प्रत्येकजण इम्प्रेस आहे. तर, याचवेळी अनु मलिक स्वतःचे कान पकडणार आहेत (Indian Idol 12 Anu Malik impressed by Aashish Kulkarni latest performance).

आशिष कुलकर्णी या आठवड्यात किशोर कुमार यांची ‘बाबू समझो ईशारे’ आणि ‘ये जो मोहब्बत है’ ही गाणी सादर करणार आहेत. आशिष इतके चांगले गाणे गाईल की, सर्व परीक्षक त्याची स्तुती करताना दिसतील. त्याचवेळी, अनु मलिक आशिषच्या सादरीकरणावर इतके प्रभावित होतील की, त्याची तोंडभर स्तुती करतील.

सोनी टीव्हीने इंडियन आयडॉल 12चा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये आशिष गाताना दिसत आहे. त्यांचे गाणे ऐकल्यानंतर अमित दा वंडरफुल म्हणून त्याचे कौतुक करणार आहेत. त्याचबरोबर हिमेश रेशमिया, नेहा कक्करही आशिषची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

पाहा व्हिडीओ

 (Indian Idol 12 Anu Malik impressed by Aashish Kulkarni latest performance)

अनु मलिकने घेतली आशिषची ऑटोग्राफ

गेल्या आठवड्यात अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंटाशिर या शोमध्ये खास पाहुणे म्हणून आले होते. त्या भागामध्ये आशिषने ‘ए भाई जरा देख के चलो’ हे गाणे सादर केले होते. अनु मलिकला त्याचे हे गाणे प्रचंड आवडले. त्या भागात त्यांनी आशिषचा ऑटोग्राफही घेतला होता. आशिषच्या सादरीकरणामुळे आनंदित अनु मलिक म्हणाले होते की, ‘आशिष, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. हे तुमचे जबरदस्त सादरीकरण आहे. मी तुम्हाला या मंचावर यापूर्वी ऐकले आहे आणि तुझा आवाज खूप चांगला आहे. मी या कार्यक्रमाचा एक भाग आहे याचा मला आनंद आहे आणि मला भारतातील असा प्रतिभावान आवाज ऐकण्याची संधी मिळत आहे.’

कोरोनामुक्त होऊन आदित्य नारायण परतला

‘इंडियन आयडॉल’ या शोचा होस्ट आदित्य नारायण कोरोना विषाणूच्या विळख्यात आडकला होता. ज्यानंतर तो काही आठवड्यांपासून या शोमधून गायब होता. त्याच्या अनुपस्थित जय भानुशाली हा शो होस्ट करत होता. गेल्या आठवड्यात आदित्य पुन्हा शोमध्ये परतला आहे. मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही तो सर्वांसह धमाल करताना दिसणार आहे.

(Indian Idol 12 Anu Malik impressed by Aashish Kulkarni latest performance)

हेही वाचा :

गोवा फॉरवर्ड पार्टी आक्रमक, ‘सूर नवा ध्यास नवा’चे गोव्यातील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न! पाहा नेमकं काय झालं…

90 टक्के डॉक्टर राक्षस झालेत, आक्षेपार्ह भाषा अंगलट, कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.