Indian Idol 12 | एकीकडे शो वादात, तर दुसरीकडे अरुणिता आणि पवनदीपची मैत्री नव्या वळणावर, ‘हे’ नवे नाते चर्चेत!

‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा सिंगिंग रिअॅलिटी शो या क्षणी चर्चित बातम्यांचा एक भाग बनला आहे. शोमध्ये दर आठवड्याला एक खास थीम ठेवली जाते. या आठवड्यात स्पर्धक धमाल करताना दिसणार आहेत.

Indian Idol 12 | एकीकडे शो वादात, तर दुसरीकडे अरुणिता आणि पवनदीपची मैत्री नव्या वळणावर, ‘हे’ नवे नाते चर्चेत!
इंडियन आयडॉल 12
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 4:06 PM

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा सिंगिंग रिअॅलिटी शो या क्षणी चर्चित बातम्यांचा एक भाग बनला आहे. शोमध्ये दर आठवड्याला एक खास थीम ठेवली जाते. या आठवड्यात स्पर्धक धमाल करताना दिसणार आहेत. गाण्याच्या या स्पर्धेत या आठवड्यात मोठी चुरस दिसणार आहे. या शोचा सुपर डायनामिक होस्ट आदित्य नारायण आपल्या क्युट शैलीने या भागाच्या आकर्षणात भर घालणार आहे. तसेच परीक्षक आणि स्पर्धकांसह काही मनोरंजक क्षण या मंचावर दिसणार आहेत (Indian Idol 12 latest update Arunita Kanjilal learn harmonium from Pawandeep Rajan).

अनु मलिक आणि सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुंटाशिर यांच्या समवेत या शोमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असून, अनु मलिक मुलींच्या टीमला साथ देतील, तर मनोज मुंटाशिर या मुलांच्या टीमचे नेतृत्व करणार आहेत.

अरुणिताने वाजवले हार्मोनियम!

यावेळी सर्व स्पर्धक एकापेक्षा एक परफॉरमन्स देताना दिसतील, तर अरुणाता कांजिलाल आणि अंजली गायकवाड यांच्या ‘लागा चुनरी में डाग’ या गाण्यावरील शानदार सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सादरीकरणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच अरुणिता हार्मोनियम वाजवताना दिसणार आहे. या दोघांच्या सादरीकरणादरम्यान अंजली गायकवाडने तिच्या आवाजाची जादू प्रत्येकाला मोहित करत होती, तर हार्मोनियम वाजवण्याच्या कौशल्याने अरुणिताने सर्वांनाच चकित केले. रंगमंचावर अशी उत्कृष्ट प्रतिभा पाहिल्यानंतर प्रत्येकानेच तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अरुणिताचे हे कौशल्य पाहून परीक्षक अनु मलिक खूप खूश झाले आणि अरुणिताने हे वाद्य वाजवण्यास कोणाकडून शिकले, हे जाणून घ्याययचा प्रयत्न त्यांनी केला (Indian Idol 12 latest update Arunita Kanjilal learn harmonium from Pawandeep Rajan).

‘या’ खास व्यक्तीने शिकवले हार्मोनियम

या प्रश्नाला उत्तर देताना अरुणिता कांजीलाल म्हणाली, ‘मला नेहमीच हार्मोनियम शिकण्याची इच्छा होती, परंतु तशी संधी मला कधी मिळाली नाही. इंडियन आयडॉल सीझन 12मुळे मला ही संधी मिळाली आणि यावेळी मी हे वाद्य शिकण्याचे ठरविले. मी पवनदीप राजन यांच्याकडे त्यासाठी मदत मागितली. त्याने मला काही आठवड्यांत मोठ्या संयम व उदारतेने हार्मोनियम वाजवण्यास शिकवले. त्यानेच मला हे वाद्य रंगमंचावर वाजवण्याचा आत्मविश्वासही दिला. मला भविष्यात अशी आणखी वाद्ये शिकण्याची इच्छा आहे. तो खूप हेल्पफुल आहे आणि मला त्याच्या रुपाने एक गुरु मिळाल्याचा मला आनंद आहे. ”

पवनदीपला कुमार सानूंनी शिकवला रोमान्स

गेल्या आठवड्यात श्रवण राठोड विशेष भागात कुमार सानू खास पाहुणे म्हणून शोमध्ये आले होते. तिथे त्यांनी पवनदीप राजन आणि अरुणिता यांच्या सोबत गाणे देखील गायले. शोमध्ये कुमार सानू हिमेश रेशमियाच्या सांगण्यावरून पवनदीपला रोमान्स शिकवतात. यावेळी ते ‘दो दिल मिल रहे है; हे गाणे गातात. या गाण्याच्या दरम्यान कुमार सानू, पवनदीप आणि अरुणिता यांना एकमेकांसमोर उभे करतात आणि पवनदीपचे डोळे उघडून त्याला समोर बघण्यास सांगतात.

(Indian Idol 12 latest update Arunita Kanjilal learn harmonium from Pawandeep Rajan)

हेही वाचा :

Pichyar : iPhone वर शूटिंग झालेला पहिला सिनेमा, स्ट्रगलर्सचा संघर्ष मांडणारा ‘पिच्चर’ रिलीज

प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.