Indian Idol 12 Shocking Elimination : सवाई भट्टवर प्रेक्षक नाराज? कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!  

सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian Idol 12) रविवारी (20 जून) पुन्हा एक एलिमिनेशन फेरी पार पडली. या एलिमिनेशनमध्ये राजस्थानमधील लोकप्रिय स्पर्धक सवाई भट्ट शोच्या बाहेर गेला आहे.

Indian Idol 12 Shocking Elimination : सवाई भट्टवर प्रेक्षक नाराज? कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!  
सवाई भट्ट
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 10:29 AM

मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian Idol 12) रविवारी (20 जून) पुन्हा एक एलिमिनेशन फेरी पार पडली. या एलिमिनेशनमध्ये राजस्थानमधील लोकप्रिय स्पर्धक सवाई भट्ट शोच्या बाहेर गेला आहे. अंजली गायकवाडच्या एलिमिनेशननंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसला आहे. शोच्या शेवटी, जेव्हा आदित्य नारायणने कमीतकमी मत मिळालेल्या स्पर्धकांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण यात स्पर्धेतील दोन प्रसिद्ध गायक सवाई भट्ट आणि पवनदीप यांची नावे सर्वात शेवटी होती आणि कमी मते मिळाल्यामुळे सवाई भट्ट या शोमधून बाहेर पडला (Indian Idol 12 Shocking Elimination Sawai Bhatt got eliminated).

यावेळी सवाई भट्ट याने ‘इंडियन आयडॉल 12’चे आभार मानले आणि सांगितले की, ‘इंडियन आयडॉल हे एक मोठे व्यासपीठ आहे, मला या व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. या व्यासपीठावर येणे सर्वांचे स्वप्न असते. या मंचावरून खूप काही शिकलो आहे. मी हरणार नाही, मी नक्की परत येईन.’ सोनू कक्कर हिने सवाईला सांगितले की, तो तिचा आवडता स्पर्धक आहेत. त्याचे गायन एखाद्या कुशल गायकाप्रमाणे आहे. इतकेच नाही तर, त्यांनी सवाईला विचारले की, त्याला तिच्याबरोबर एखादा म्युझिक व्हिडीओ करायला आवडेल का? यावर सवाई म्हणाला की, हे त्याच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असेल.

राजस्थानचा सवाई भट्ट

सवाईने आपल्या ‘इंडियन आयडॉल 12’च्या संपूर्ण प्रवासामध्ये सादर अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्याने आपल्या राजस्थानच्या मातीचा गंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कारण, त्याच्या संगीतात राजस्थानी लोकसंगीताची झलक दिसून येत होती. अनु मलिकपासून रेखा, कुमार सानू, नेहा कक्कर, शोचे परीक्षक आणि पाहुणे म्हणून शोमध्ये उपस्थित असणार्‍या अनेक सेलिब्रिटींनी सवाईचे कौतुक केले होते.

कोण आहे सवाई भट?

सवाई भट्ट राजस्थानमधील नागौर येथील रहिवासी आहेत. सवाई आपल्या वडिलांबरोबर कठपुतळ्यांचा खेळ सादर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याचे कुटुंब तंबू बनवून त्यातच राहते. सवाईने कोणतेही संगीत शिक्षण घेतले नसले, तरी संगीतात काहीतरी करण्याचे स्वप्न नेहमीच त्याच्या मनात होते. पण, आपल्या कुटुंबाची अवस्था पाहून सवाईला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी कधीच मिळाली नाही. आयडॉलच्या स्टेजने सवाईचे नशिब बदलले. मात्र, आयडॉलचे करंडक जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

(Indian Idol 12 Shocking Elimination Sawai Bhatt got eliminated)

हेही वाचा :

Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…

Nusrat Jahan : प्रेग्नन्सीच्या बातमीदरम्यान नुसरत जहांनं शेअर केले खास फोटो, फ्लॉन्ट करतेय बेबी बंप!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.