Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोल-तनुजा सांगणार धमाल किस्से

या भागात मायलेकींचे बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक गोष्टींचा उलगडा सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे.

Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर काजोल-तनुजा सांगणार धमाल किस्से
Kon Honaar CrorepatiImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:35 AM

‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री तनुजा (Tanuja) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) ही मायलेकींची जोडी उपस्थित राहणार आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. या दोघी जणी ‘एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ (ADAPT) या संस्थेसाठी हा खेळ खेळणार आहेत. या भागात मायलेकींचे बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक गोष्टींचा उलगडा सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे.

तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक, दिग्दर्शक निरंजन अय्यंगर आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागात उपस्थित असणार आहेत. काजोलला ‘बाजिगर’च्या सेटवर शाहरूख खान का ओरडला होता, काजोलचा पहिला सिनेमा बघताना तनुजाने तिचा हात घट्ट का धरून ठेवला होता, तनुजा यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे अनुभव, अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग रंगलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हीट होतो, अशी अफवा सिनेमाक्षेत्रात अनेक वर्षं आहे; त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत. हा विशेष भाग शनिवार 11 जून रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.