AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaun Banega Crorepati 13 : स्पर्धक आणि त्याच्या पत्नीमधील भांडण ऐकून अस्वस्थ झाले अमिताभ बच्चन, म्हणाले- कोणीतरी वाचवा…

कौन बनेगा करोडपती 13 च्या आगामी भागामध्ये एक स्पर्धक असणार आहे, ज्यांच्या पत्नीसोबतचे भांडण अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ करेल. (Kaun Banega Crorepati 13: Kaun banega crorepati 13 Contestant And His Wife complaint about each other to amitabh bachchan during the show of Kaun Banega Crorepati 13)

Kaun Banega Crorepati 13 : स्पर्धक आणि त्याच्या पत्नीमधील भांडण ऐकून अस्वस्थ झाले अमिताभ बच्चन, म्हणाले- कोणीतरी वाचवा...
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 10:38 AM

मुंबई : क्विझ रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती  13 (Kaun Banega Crorepati 13) हा प्रेक्षकांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या शोचा 13वा सीझन सर्वांची मनं जिंकत आहे. अमिताभ बच्चन शोमध्ये स्पर्धकांसोबत खूप बोलतात आणि मस्ती करतात. यासोबतच ते काही जुन्या गोष्टीही प्रेक्षकांसोबत शेअर करतात.

कौन बनेगा करोडपती 13 च्या आगामी भागामध्ये एक स्पर्धक असणार आहे, ज्यांच्या पत्नीसोबतचे भांडण अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ करेल. शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात बिग बी समुपदेशक म्हणून बोलताना दिसत आहेत.

बिग बी बनले विवाह समुपदेशक

सोनी टीव्हीने शोचा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात अमिताभ बच्चन विवाह सल्लागार बनताना आणि पती -पत्नीमधील दुरावा संपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्पर्धकाची पत्नी बिग बींना सांगते की तिचा नवरा तिला वेळ देत नाही.

स्पर्धकाने सांगितले की त्याने आपल्या पत्नीला फ्लॅश मॉबसह लग्नासाठी प्रस्ताव पाठवला होता. बिग बी प्रभावित होऊन पत्नीला विचारतात की तो अजूनही इतका रोमँटिक आहे का? यावर त्याची पत्नी म्हणते की नाही सर. अजिबात वेळ देत नाही. हे ऐकल्यानंतर स्पर्धक म्हणतात की सर, तुम्हीही जया मॅडमला वेळ देऊ शकत नाही, असं म्हणा. त्यानंतर अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की ते आता अधिकृत विवाह सल्लागार बनले आहेत. त्यानंतरही, जेव्हा जोडपे तक्रार करत राहतात, तेव्हा बिग बी म्हणतात की भाऊ, कोणीतरी आम्हाला वाचवेल का…

कौन बनेगा करोडपतीला मिळाला दुसरा करोडपती

या शोला नुकताच दुसरा करोडपती मिळाला आहे. साहिल अहिरवार हा मूळचा मध्य प्रदेशचा असून त्याने या शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. साहिलच्या आधी आग्राच्या हिमानी बुंदेला यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

फॅब्युलस फ्रायडेबद्दल बोलायचं झालं तर, येत्या आठवड्यात क्रिती सेनन आणि राजकुमार राव शोमध्ये दिसणार आहेत. ते त्यांच्या हम दो हमारे दो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. ज्यामध्ये क्रितीने तिचे प्रेम बिग बींकडे व्यक्त केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Birth Anniversary | केवळ 26 रुपये घेऊन मुंबई गाठली, 60 चित्रपटांत ‘नारद मुनी’ साकारल्यानंतर जीवन बनले लाडके खलनायक!

Happy Birthday Mallika Sherawat | कुटुंबाचा विरोध पत्कारून मनोरंजन विश्वात पदार्पण, बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिलीय मल्लिका शेरावत!

अवघ्या 17व्या वर्षी गमावला पाय, एका अपघाताने बदललं सुधा चंद्रन यांचं आयुष्य, कामातून मिळवली ओळख!

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.