KBC 13 | ‘केबीसी 13’च्या मंचावर हजेरी लावणार दीपिका-फराह, ‘इंडियन आयडॉल’चे विजेते करणार गणपती बाप्पाची आरती!
संपूर्ण भारतात सध्या गणेश चतुर्थी साजरी जोशात सुरू आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर, शुक्रवारी एक खास संध्याकाळ असणार आहे, जेव्हा ‘इंडियन आयडॉल 12’चे अंतिम फेरीचे स्पर्धक पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, षण्मुख प्रिया, सायली कांबळे, निहाल तोरो आणि मोहम्मद दानिश गणपतीची आरती करतील.
मुंबई : संपूर्ण भारतात सध्या गणेश चतुर्थी साजरी जोशात सुरू आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर, शुक्रवारी एक खास संध्याकाळ असणार आहे, जेव्हा ‘इंडियन आयडॉल 12’चे अंतिम फेरीचे स्पर्धक पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, षण्मुख प्रिया, सायली कांबळे, निहाल तोरो आणि मोहम्मद दानिश गणपतीची आरती करतील. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक फराह खान, अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वाहिनीने आपल्या ट्विटर हँडलवर स्टार-स्टडेड स्पेशल एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये इंडियन आयडॉलचे अंतिम फेरीतील स्पर्धक गणपतीला समर्पित गाणी गात आहेत.
दुसऱ्या ट्विटमध्ये, चॅनेलने म्हटले आहे की, ‘दर्शक शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता फेसबुकवर इंडियन आयडॉल 12च्या टॉप 6 स्पर्धकांसोबत लाईव्ह संभाषण करू शकतात.
पाहा प्रोमो :
Iss Ganesh Chaturthi, gyaan ke manch par, Deepika, Farah aur Indian Idol Finalists ke suron ke saath birajmaan honge Ganpati Bappa! Sajega mahotsav ka rang sabke sang. Toh dekhna mat bhoolna #KBC13 ka yeh Shaandaar Shukravaar episode, 10th Sept, raat 9 baje, sirf Sony par. pic.twitter.com/dVM5r3Z0RT
— sonytv (@SonyTV) September 4, 2021
पवनदीप ठरला विजेता!
15 ऑगस्ट रोजी झालेल्या ‘इंडियन आयडॉल सीझन 12’च्या ग्रँड फिनालेमध्ये उत्तराखंडच्या पवनदीप राजनला विजेता घोषित करण्यात आले, तर पश्चिम बंगालची अरुणिता प्रथम उपविजेती ठरली. दोघेही अनेकदा एकत्र असल्याची अफवा पसरली होती. रिअॅलिटी टेलिव्हिजनमध्ये ते सर्वाधिक मागणी असलेल्या गायक जोडींपैकी एक बनले आहेत. शोमधील त्यांची दमदार केमिस्ट्री खूप चर्चेत होती. अलीकडेच अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशनने त्यांना मुंबईत सोन्याची साखळी भेट दिली होती.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने ‘इंडिया आयडॉल 12’चा विजेता पवनदीपला 25 लाख रुपयांचा धनादेश आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार बहाल केली. अंतिम फेरीतील अरुणिता कांजीलाल आणि सायली कांबळे यांना परीक्षकांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित केल्यानंतर प्रत्येकी 5 लाख रुपये बक्षीस दिले. मोहम्मद दानिशला थर्ड रनर-अप आणि निहाल तोरोला चौथा रनर-अप म्हणून घोषित करण्यात आले. या दोघांना प्रत्येकी 3 लाख रुपये देण्यात आले.
प्रेक्षकांसह लाईफ लाईन परतल्या!
विशेष गोष्ट म्हणजे कौन बनेगा करोडपतीच्या या हंगामात अनेक बदल करण्यात आले आहेत. ऑडियन्स पोलची लाईफलाईन या हंगामात पुनरागमन करत आहे. स्टुडिओत प्रेक्षकांना एन्ट्री मिळत असल्याने पुन्हा एकदा या सेटचे रुपडे पालटणार आहे. यामुळे शोचे वातावरण देखील पूर्णपणे बदलणार आहे. या सिझनमध्ये ‘50:50’, ‘आस्क द एस्पर्ट’ आणि ‘फ्लिप द क्वेश्चन’ या तीन लाईफ लाईन्स देखील केबीसीमध्ये पुनरागमन करत आहे.
‘बिग बी’देखी उत्साही
याविषयी बोलताना मेगास्टार अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘कौन बनेगा करोडपतीशी माझा संबंध 21 वर्षांचा आहे. हे कदाचित पहिल्यांदाच होते की गेल्या हंगामात, स्टुडिओत कोणतेही प्रेक्षक नव्हते, जे नेहमी या शोचा भाग असायचे आणि आम्ही लाईफ लाईनमध्येही मोठा बदल पाहिला आहे.’ अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मला आनंद आहे की, या हंगामात स्टुडिओत प्रेक्षक पुन्हा उत्साहाने परत आले आहेत आणि लाईफलाईन प्रेक्षक सर्वेक्षण देखील आहे. हा माझ्यासाठी प्रत्येक वर्षी एक समृद्ध करणारा अनुभव आहे, सर्व क्षेत्रातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे आणि आता हा खेळ आकर्षक आणि परिपूर्ण बनवण्यासाठी पुन्हा सज्ज झालो आहोत.’
हेही वाचा :
Bhoot Police Review : कधी हसवतो तर कधी घाबरवतो सैफ-अर्जुनचा चित्रपट, वाचा कसा आहे ‘भूत पोलीस’?