KBC 13 | ‘केबीसी 13’च्या मंचावर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा बनला पोलीस, अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवला हरयाणवी भाषेत!
यावेळी ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या (KBC 13) 'फॅन्टास्टिक फ्रायडे' या भागात, ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश (PR Sreejesh) येणार आहेत.
मुंबई : यावेळी ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या (KBC 13) ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’ या भागात, ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश (PR Sreejesh) येणार आहेत. KBC 13च्या या विशेष भागात, नीरज चोप्रा शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना हरियाणवी शिकवताना दिसणार आहेत. या भागाचे अनेक प्रोमो समोर आले आहेत, जे व्हायरल झाले आहेत. प्रोमोमध्ये नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगताना दिसत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरेही देत आहेत.
एका प्रोमोमध्ये नीरजने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातील संवाद हरियाणवी भाषेत शिकवले. हा संवाद शिकवतान नीरज म्हणाला की, ‘ये थारे बाप का घर कोनी, थाणा है, सीधा खड़ा रहा..’ अमिताभ बच्चन यांनीही त्याची पुनरावृत्ती करत हरियाणवी शैलीत हा डायलॉग सदर केला. जेव्हा नीरज आणि श्रीजेश शोमध्ये पोहोचले, तेव्हा केबीसीचा स्टेज ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी दूमदूमला होता.
याशिवाय, नीरजने ‘दीवार’ चित्रपटाच्या प्रसिद्ध डायलॉगच्या हरियाणवी शैलीत ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’ आणि ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें किया करती हैं’ हा संवादही हरयाणवी भाषेत बोलून दाखवला आहे. नीरजच्या प्रत्येक डायलॉगवर खूप टाळ्या मिळाल्या.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा भालाफेकमध्ये पदक जिंकणारा भारताचा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला खेळाडू आहे. 23 वर्षीय नीरज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय आहे. या भालाफेकपटूने नेमबाज अभिनव बिंद्रानंतर देशासाठी दुसरे सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी 2008च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त अभिनव बिंद्रानेच सुवर्णपदक जिंकले होते.
दुसरीकडे, भारतीय पुरुष हॉकी संघानेही ऑलिम्पिकमध्ये मोठे यश मिळवले. संघाने 1980 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. कांस्यपदक जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी झाला. संघाच्या यशात गोलरक्षक पीआर श्रीजेशची महत्त्वाची भूमिका होती.
संघर्षाची कहाणी
या मंचावर अमिताभ बच्चन दोघांना विचारणार आहेत की, ‘तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली?’ त्यानंतर श्रीजेश म्हणतो की, ‘आम्ही 2012 मध्ये एकही सामना जिंकला नाही आणि जेव्हा आम्ही भारतात परतलो, तेव्हा सगळे आमच्यावर हसत होते.’ त्याचवेळी नीरज म्हणाला, ‘जेव्हा मी पहिल्यांदा स्टेडियममध्ये गेलो होतो, तेव्हा 30-40 मीटर थ्रो होता, 40 ते 80 मीटरपर्यंत पोहोचण्यासाठी मला 10 वर्षे मेहनत करावी लागली.’
त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून ‘बिग बी’ म्हणाले की, जेव्हाही मेहनत आणि समर्पणाचे उदाहरण दिले जाईल, तेव्हा श्रीजेश आणि नीरज यांची नावे पहिली येतील.