Kiran Mane: ‘त्या व्हिडीओनं लाज घालवलीय महाराष्ट्राची’; किरण माने यांनी व्यक्त केला संताप
महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या राजकीय नाट्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यातच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने (Shivsena) आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. बंडखोरांच्या विरोधात कठोर कारवाईचा निश्चय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. तर राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांच्या विरोधात निषेध मोर्चे, फलकांना काळे फासण्याचे प्रकार लागोपाठ दुसऱ्या दिवशीही घडले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटानेही शक्तिप्रदर्शन केलं. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या राजकीय नाट्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यातच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
पोस्ट 1-
‘भूकंप, हातोडा बंद करा. या भूकंपानं कुनाचा केस बी हाल्लेला नाय. सत्तेसाठी हिडीसपणा सुरू आहे. त्या व्हिडीओनं लाज घालवलीय महाराष्ट्राची. दोस्तांनो, आपली वारी दाखवा. लोक खुश होत्याल. इठ्ठलइठ्ठलइठ्ठल’, असं त्यांना एका पोस्टमध्ये म्हटलंय.
पोस्ट 2-
‘न्यूज चॅनलवाल्या माझ्या मित्रांनो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला मालकाचे आदेश असतात. पण आता लै बील झालं. पळपुट्या गद्दारांना आणि त्यांच्यावर करोडो रूपये खर्च करणार्या फडतूसांना हिरो करणारे मोठेमोठे अर्ध्या तासांचे खोटे कार्यक्रम दाखवणं बंद करा. आमच्या सातार्याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद झालाय. जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये आपल्या आर्मीचं ‘ऑपरेशन रक्षक’ सुरू असताना, जवान सुरज शेळके याला वीरमरण आलं आहे. फक्त 23 वर्ष वय असलेल्या माणदेशी मातीतल्या, खटावच्या सुपुत्रानं देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्यात. त्याच्यावर एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दाखवा. त्याच्या मित्रांच्या, गावातल्या लोकांच्या मुलाखती दाखवा. देशासाठी जीव ओवाळून टाकणार्यांची खरी ‘पॅशन’ दाखवा. लोकांना कळूद्या ‘खरे हिरो’ कसे असतात ते. सुरज, तुला कडकडीत सलाम! जयहिंद,’ अशी दुसरी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असताना एकनाथ शिंदे गट काहीसा सावध झाल्याचं चित्र शनिवारी पहायला मिळालं. आम्ही शिवसेनेचेच आहोत, अशी ग्वाही शिंदे गटाने दिली. शिंदे गटाच्या वतीने पहिल्यांदाच गुवाहाटीत पत्रकार परिषद घेण्यात आली. “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. 2019 च्या निवडणुकीतील युतीनुसार भाजप-शिवसेना युतीचं सरकार सत्तेत यावं”, अशी भूमिका या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.