AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane | महिला दिनानिमित्त किरण माने यांची खास पोस्ट, सावित्रीच्या लेकींना…

अभिनेते किरण माने यांनी महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता ही पोस्ट चर्चेचा विषय ठरलीये. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीये.

Kiran Mane | महिला दिनानिमित्त किरण माने यांची खास पोस्ट, सावित्रीच्या लेकींना...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 4:57 PM

मुंबई : मुलगी झाली हो या मालिकेतील वादानंतर किरण माने यांचे नाव चर्चेत आले. मुलगी झाली हो या मालिकेतून बाहेरचा रस्ता अचानकपणे किरण माने (Kiran Mane) यांना दाखवण्यात आला. बिग बाॅस मराठीमध्येही किरण माने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे टाॅप 3 पर्यंत पोहचण्यात त्यांना यश मिळाले. बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमध्येही त्यांनी जबरदस्त असा गेम खेळला. मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्यांवर किरण माने यांनी गंभीर आरोप केले होते. अनेकांनी परत एकदा किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेत घेण्याची विनंतीही केली. हा वाद खूप जास्त वाढला होता. अनेक राजकिय पक्षांच्या लोकांनीही या वादात उडी घेतली होती.

8 मार्च महिला दिनानिमित्त आज किरण माने यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिनानिमित्त संपूर्ण राज्यात अनेक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनीच महिला दिनानिमित्त महिलांना खास पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. किरण माने यांनी महिला दिनानिमित्त लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती गाढ झोपेत असते. अचानक कानात मोबाईल आरवू लागतो. झोपेतच ती वैतागते. डोळे तसेच मिटून, हाताने मोबाईल चाचपून अलार्म ऑफ करणार, तेवढ्यात तिचा मेंदू ऑन होऊन तिला वाॅर्निंग देतो, “अगं ए..उठ. आज रेवाला सकाळची शाळाय… ती ताडकन उठून बसते… दिवसभरातल्या अनेक कामांची लिस्ट तिच्या डोक्यात स्क्रोल होऊ लागते…

एका ‘वर्किंग वूमनचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो, असेही किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. क्षेत्र कुठलंही असो, दिनचर्या हीच असते…आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची सांगड घालताना वर्किंग विमेनना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे ‘स्वत:साठीचा वेळ’ ! काम करणारे पुरूष आरामासाठी शनिवार रविवारची वाट पहातात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वर्किंग विमेनबद्दल लिहिले आहे. इतकेच नाही तर पोस्टच्या शेवटी त्यांनी महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम देखील केलाय. आता किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट प्रचंड आवडली देखील आहे. चाहते आता या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता किरण माने यांच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.