Kiran Mane: ‘निक्कालच लावून टाकायचा ना थेट’, किरण मानेंची सुप्रीम कोर्टाबद्दलची उपरोधिक पोस्ट चर्चेत

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. किरण माने यांनी या घडामोडींबद्दल पोस्ट लिहित सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) निशाणा साधला आहे.

Kiran Mane: निक्कालच लावून टाकायचा ना थेट, किरण मानेंची सुप्रीम कोर्टाबद्दलची उपरोधिक पोस्ट चर्चेत
Kiran Mane
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Jun 27, 2022 | 3:05 PM

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. आज (सोमवार) संध्याकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचं आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. तसंच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी झाली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. किरण माने यांनी या घडामोडींबद्दल पोस्ट लिहित सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) निशाणा साधला आहे. ‘आपन उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

किरण माने यांची पोस्ट-

‘काय स्पीड हाय राव! आपन उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी 6.30 ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून, संध्याकाळी 7.30 वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्विकारली आणि उद्या 27 ला सुनावणी ठरवलीसुद्धा. निक्कालच लावून टाकायचा ना थेट, जय सुप्रिम कोर्ट,’ अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.

किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे,’ असं एका युजरने लिहिलंय. तर ‘आणि लॉकडाऊनमध्ये कामगार चालून मेले पण सुप्रीम कोर्टाने दया नाही दाखवली,’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांच्या याचिका खूप वेळ लटकत राहतात,’ अशीही तक्रार नेटकऱ्याने केली. किरण माने यांनी याआधीही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर पोस्ट लिहिल्या आहेत. ‘सत्तेसाठी हिडीसपणा सुरू आहे. त्या व्हिडीओनं लाज घालवलीय महाराष्ट्राची,’ असं त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.