Kiran Mane: ‘राजकारणी लोकं लै वांड’, राजकीय घडामोडींवर किरण मानेंचा उपरोधिक टोला

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं होतं. या घडामोडींवर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे मतं व्यक्त केली. आता अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर राज्यातील राजकीय घडामोडींवर उपरोधिक पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane: राजकारणी लोकं लै वांड, राजकीय घडामोडींवर किरण मानेंचा उपरोधिक टोला
राजकीय घडामोडींवर किरण मानेंचा उपरोधिक टोला
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 03, 2022 | 10:50 AM

विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात शक्तिप्रदर्शन होणार आहे. या अधिवेशनात कोणी कोणता पक्षादेश पाळायचा, यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात तीव्र संघर्षाची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं होतं. या घडामोडींवर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे मतं व्यक्त केली. आता अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर राज्यातील राजकीय घडामोडींवर उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. किरण माने हे नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध घडामोडींवर आपली मतं व्यक्त करत असतात. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

‘राजकारणी लोकं लै वांड! भाजपानं शब्द फिरवल्यावर शिवसेनेनं कोलांटउडी मारून मुख्यमंत्रीपद मिळवलं. राष्ट्रवादी-काँग्रेसला सत्ता मिळणारच नव्हती. ती त्यांनी तब्बल अडीच वर्ष रेटून भोगली. दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे ‘जॅकपॉट’ लागल्यागत दिलं. या सगळ्यात ज्यांची मुख्यमंत्रीपदासाठी तडफड चालली होती, ते बिचारे निरूपयोगी पदावर बसवले. #डांबरट_राजकारणी,’ अशी उपरोधिक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

किरण माने यांची पोस्ट-

याआधीही त्यांनी राजकीय घडामोडींवर विविध पोस्ट लिहिले होते. ‘भूकंप, हातोडा बंद करा. या भूकंपानं कुनाचा केस बी हाल्लेला नाय. सत्तेसाठी हिडीसपणा सुरू आहे. त्या व्हिडीओनं लाज घालवलीय महाराष्ट्राची. दोस्तांनो, आपली वारी दाखवा. लोक खुश होत्याल. इठ्ठलइठ्ठलइठ्ठल’, असं त्यांना एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.

कडेकोट बंदोबस्त

दोन दिवसांच्या अधिवेशनात शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादावादी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. विधान भवनाच्या आसपास दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधान भवनात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.