Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना 41 दिवसानंतरही शुद्ध नाहीच, जाणून घ्या आता नेमकी कशी आहे तब्येत?

काही दिवसांपूर्वी डाॅक्टरांनी सांगितले होते की, राजू श्रीवास्तव यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती. मात्र 41 दिवस उलटूनही राजू यांना शुद्ध आली नाहीये.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना 41 दिवसानंतरही शुद्ध नाहीच, जाणून घ्या आता नेमकी कशी आहे तब्येत?
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 8:50 AM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या 41 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. एम्समधील तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम राजू यांच्यावर उपचार करते आहे. 41 दिवसांपासून राजू हे व्हेंटिलेटरवरच (Ventilator) आहेत. त्यांना अजून एक वेळही शुद्ध आली नाहीये. यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तव यांना शुद्ध येत नसल्याने डाॅक्टरांचे देखील टेन्शन (Tension) वाढले आहे. मध्यंतरी राजू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याने डाॅक्टरांनी राजू यांच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती.

राजू श्रीवास्तव यांच्यावर 41 दिवसांपासून उपचार सुरू

काही दिवसांपूर्वी डाॅक्टरांनी सांगितले होते की, राजू श्रीवास्तव यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती. मात्र 41 दिवस उलटूनही राजू यांना शुद्ध आली नाहीये. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, असे आवाहन राजू यांची मुलगी अंतरा हीने चाहत्यांना केले होते.

संसर्ग टाळण्यासाठी डाॅक्टरांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय

राजू यांची सध्या तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जातंय. मात्र, तब्येतीमध्ये सुधारणा जास्त होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे तर राजू यांना ताप देखील येतंय. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या व्हेंटिलेटरचा पाईप बदलला, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका होऊ नये. संसर्ग टाळण्यासाठी डाॅक्टरांनी राजू यांच्या पत्नीला आणि मुलीला देखील राजू यांना भेटण्यासाठी मनाई केलीये.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.