‘तुझेच मी गीत गात आहे’साठी उर्मिला कोठारेने स्वीकारलं नवं आव्हान, ‘नो मेकअप लूक’मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला भेटीला येईल.

‘तुझेच मी गीत गात आहे’साठी उर्मिला कोठारेने स्वीकारलं नवं आव्हान, 'नो मेकअप लूक'मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
उर्मिला कोठारे- तुझेच मी गीत गात आहेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 8:10 AM

मुंबई : स्टार प्रवाहवर (Star Pravah) 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gat Ahe) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून प्रोमोमध्ये दिसणारे लोकेशन्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय. या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं. त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं असून वास्तवादी चित्रण करण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे (Urmila Kothare) नो मेकअप लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला भेटीला येईल. रणरणत्या उन्हात शूट करताना तिची कसोटी लागतेय. भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतून उर्मिला जवळपास १२ वर्षांनंतर टीव्ही विश्वात पुनरागमन करणार आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ही नवी मालिका तुझेच मी गीत गात आहे 2 मे पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचं हे मराठी व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेचा प्रोमो उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या भूमिकेविषयी चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे

संबंधित बातम्या

Rinku Rajguru | आर्चीचा पांढऱ्या साडीमध्ये स्पेशल लूक, फोटो पाहून नेटकरी घायाळ!

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत

“हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..”; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.