Video | वीणा नाही, तर शिव ठाकरेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसली जोडी!

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) यांचा ब्रेकअप सध्या चर्चेत असतानाच, आता शिव आणखी एक दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आहे.

Video | वीणा नाही, तर शिव ठाकरेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसली जोडी!
शिव ठाकरे-आयुषी भावे
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 2:03 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) यांचा ब्रेकअप सध्या चर्चेत असतानाच, आता शिव आणखी एक दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आहे. शिवला या अभिनेत्रीसोबत बघताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांची ही केमिस्ट्री आणि हा रोमँटिक अदाज केवळ एका पुरस्कार सोहळ्यातील डान्स पर्फोर्मंससाठी होता. शिवसोबत दिसलेली ही अभिनेत्री म्हणजे ‘डान्सिंग क्वीन’ आयुषी भावे (Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave).

‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच शिवचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या रोमँटिक व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत शिव एका अभिनेत्री आयुषी भावेसह रोमँटिक अंदाजात दिसतोय.

पाहा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ

(Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave)

या व्हिडीओत शिव आणि आयुषी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला होता की, नेमकी ही जोडी रोमान्स करताना कशी दिसतेय? तर, अनेकांना वीणा कुठे गेली?, असा प्रश्न पडला होता.

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिव आणि आयुषीने परफॉर्म केले आहे आणि याचदरम्यान दोघांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत दोघांचा रोमँटिक अंदाज तर, दिसतोय पण त्यासोबत दोघांची सिझलिंग केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधतेय. शाहरुख खान-करीना कपूरच्या ‘अशोका’ चित्रपटातील ‘सन सनन’ या गाण्यावर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे (Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave).

शिव-वीणाच्या ब्रेकअपची चर्चा

‘बिग बॉस’च्या घरात शिव-वीणा यांनी एकमेकांची नावं हातावर गोंदवून घेतली होती. इतकेच नाही तर, या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडिया पेजवर शिव कधी एकटा दिसला नाही आणि वीणाही कधी एकटी दिसली नाही. ही जोडी नेहमीच एकत्र दिसत होती. मात्र, आता ही जोडी एकत्र दिसणं अगदीच दुर्मिळ झालं आहे. तसे एरव्ही एकत्र दिसणारे शिव-वीणा ही जोडी, शिवच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र गैरहजर होती. नुकताच शिवने ‘बी रिअल’ हा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आणि या लॉन्चिंग पार्टीमध्ये त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आणि लवकरच त्याच्या आयुष्याची होणारी साथीदार वीणा मात्र कुठेच दिसली नाही. या सोहळ्याला वीणाचं नसणं, हे या चर्चेला निमित्त ठरलं आहे.

ब्रेकअपच्या चर्चांवर काय म्हणाला शिव ठाकरे?

नेहमी दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर काहीच गोष्टी शेअर केल्या नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी नात्याबद्दल विचारल्यानंतर शिव ठाकरेने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. याबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला, ‘आम्ही  दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की, नक्कीच लग्नाचा विचार करू.’ आमचा ब्रेकअप झालेला नाही, लग्नबांधनात अडकायला आवडेल, असेही तो पुढे म्हणाला.

(Marathi Bigg Boss Fame Shiv Thakare sizzling dance with actress aayushi bhave)

हेही वाचा :

Video | शिमरी साडी अन् डायमंड नेकलेस, ‘पाठक’बाईंच्या नव्या लूकला ग्लॅमरचा तडका! पाहा खास व्हिडीओ  

Sagar Sarhadi Death | ‘कभी-कभी’ फेम लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन, जॅकी श्रॉफने व्यक्त केला शोक!

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.