VIDEO | जाऊया डबल सीट रं… ‘देवमाणूस’मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स

अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो-व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Devmanus Divya Singh Neha Khan Dance)

VIDEO | जाऊया डबल सीट रं... 'देवमाणूस'मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स
नेहा खानचा शिखरेंसोबत डान्स
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 12:40 PM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या रंजक वळणावर आहे. एसीपी दिव्या सिंह एकीकडे देवीसिंहचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे हाच देवीसिंह अर्थात भुरटा डॉक्टर अजितकुमार देव डिंपलशी लग्नगाठ बांधायला जात आहे. डॉक्टर आणि डिम्पीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असतानाच एसीपी दिव्याचाही डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत दिसत आहेत चक्क हवालदार शिखरे. (Marathi Serial Devmanus ACP Divya Singh Neha Khan Dance Video on Double Seat De Danadan Song Viral Trending on Social Media)

‘दे दणादण’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं

‘दे दणादण’ या चित्रपटातील “पोलीसवाल्या सायकलवाल्या, बिरेक लावून थांब, टोपी तुझी रं हातात माझ्या होईल कसं रं काम, जाऊ या डबल सीट रं. लांब लांब लांब” हे गाणं अत्यंत लोकप्रिय आहे. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तब्बल 34 वर्षांनंतरही ताजं आहे. आजही या गाण्यावर अनेक जण परफॉर्म करतात. एसीपी दिव्या सिंहची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नेहा खानलाही यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

दिव्या आणि शिखरेंची जोडी

अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो-व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला, ज्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत दिसतात देवीसिंह प्रकरणाचा तपास करणारे हवालदार शिखरे. अभिनेते सत्यवान शिखरे ही भूमिका साकारत आहेत. म्हणजे त्यांचं खरं आडनावच व्यक्तिरेखेलाही देण्यात आलं आहे. छोट्या पडद्यावर धीरगंभीर दिसणाऱ्या शिखरे या व्हिडीओमध्ये मिश्किल अंदाजात नाचताना दिसत आहेत. अखेरीस तर दिव्या आणि शिखरे हे दोघंही बागडत निघाल्याचंही दिसतं.

पाहा व्हिडीओ :

(Devmanus Divya Singh Neha Khan Dance)
View this post on Instagram

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

मालिकेत सध्या काय चाललंय?

सध्या मालिकेत डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाच्या सीनचे शूटिंग पूर्ण झाले. महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेची टीम बेळगावात शूटिंग करत आहे. डॉक्टर सगळ्यांना घेऊन रिसॉर्टवर आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Devmanus | ‘देवमाणूस’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडणार? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिले संकेत!

Devmanus | ‘देवमाणसा’च्या पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती!

Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?

(Marathi Serial Devmanus ACP Divya Singh Neha Khan Dance Video on Double Seat De Danadan Song Viral Trending on Social Media)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.