खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो, अभिनेता किरण मानेंच्या जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!

छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो, अभिनेता किरण मानेंच्या जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!
किरण माने
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:50 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत माऊचं ‘साजिरी’ असं नामकरण झालंय. तिच्या वडिलांनी देखील तिचा मुलगी म्हणून स्वीकार केलाय. त्यामुळे मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता तर साजिरीने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘विलास ऑटोमोबाईल्स’ नावाने छोटंस दुकान थाटलं आहे (Mulgi Zali Ho fame Actor Kiran Mane share his old automobile shop story on social media).

साजिरीने वडिलांचं आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं केलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतला हा अत्यंत भावनिक प्रसंग विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते किरण माने (Kiran Mane)  यांच्या खऱ्या आयुष्याशी साधर्म्य साधणारा आहे. हा भावनिक प्रसंग शूट करताना किरण माने यांच्यासमोर जुन्या दिवसांचा अल्बम उलगडला. यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.

लै भयाण दिवस होते…

संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणाले, ‘लै भयाण दिवस होते ते भावांनो…नाटक-अभिनयाचा ‘नाद’ सोडून गुपचूप सातारला येऊन, हायवेला वाढे फाट्यावर ‘किरण ऑटोमोटिव्ह’ हे दुकान टाकून बसायला लागलं होतं. जवळपास सतरा-अठरा वर्षांपुर्वीची गोष्ट… लै दोस्तांना म्हायतीय.. पन नविन दोस्तांसाठी परत एकदा. कारन बी तसंच हाय. सातार्‍यात हायवेवरच्या माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात बसलोवतो …मनाविरूद्ध नाटक – अभिनय सोडून ‘इंजिन ऑईल’च्या धंद्यात अक्षरश: घुसमटलोवतो…दुर्दैवानं दुकान भारी चालू लागलं आनी जास्तच अडकलो.. ‘पैसा का पॅशन’?? डोकं भिर्रर्रर्र झालंवतं… पायाला भिंगरी लागलेल्या माझ्यासारख्या भिरकीट डोक्याच्या पोराचं बूड एके ठिकानी स्थिर झाल्यामुळं घरातले सगळे मात्र लैच आनंदात होते. तर एक दिवस दुकानात हिशोबाची वही काढताना अचानक आदल्या दिवशीच्या पेपरचं रद्दीसाठी काढून ठेवलेलं एक पान पायाशी पडलं…छोट्या जाहीराती असलेलं ते पान होतं.

मी ते परत वर ठेवलं. परत कायतरी करत असताना बहुतेक फॅनच्या वार्‍यानं ते पान परत खाली पडलं…आता लैच गडबडीत असल्यामुळं मी ते पान टेबलवर ठेवलं…नंतर जेवनाच्या वेळी टिफीनखाली त्यो पेपर घेताना त्यावर ‘पं. सत्यदेव दूबे’ अशी अक्षरे दिसल्यासारखी झाली… आग्ग्गाय्यायाया.. डोळं चमाकलं.. कुतूहल चाळवलं ! पुण्यातल्या ‘समन्वय’तर्फे पं. सत्यदेव दुबे यांची ‘अभिनय कार्यशाळा’ आयोजित करन्यात आलीवती..ती तीन-चार ओळींची लै छोटी जाहीरात होती. माझ्या मनात काहूर माजलं… च्यायला आपन काय करतोय हितं? काय करनारंय पुढं हे दुकान चालवून ??( Mulgi Zali Ho fame Actor Kiran Mane share his old automobile shop story on social media)

आयुष्यात ‘नाटक’ नसंल – ‘अभिनय’ नसंल तर काय अर्थय जगण्यात??? अशा विचारांनी डोक्याचा भुगा झाला. एवढ्यात शेजारपाजारचे दुकानदार – मॅकेनिक यांच्या हाका ऐकू आल्या “ओ किरनशेठ ,या जेवायला”… अंगावर सर्रकन काटा आला ! हितनं पुढं आयुष्यभर माझी ही वळख असनारंय का ? किरणशेठ? ह्यॅट ..अज्जीब्बात नाही! मी तसाच न जेवता उठलो , ‘समन्वय’ च्या संदेश कुलकर्णीला फोन लावला..आणि दुकानाला कुलूप लावलं ! (ते कुलूप नंतर उघडलंच नाही , आजपर्यंत !)

मुलगी झाली हो मालिकेत माऊनं विलाससाठी उभ्या केलेल्या ‘विलास ऑटोमोबाईल्स’चा जो सिन बघाल, तो करत असताना… मी ते दुकान पाहिलं आहे. इंजिन ऑईल्सचे कॅन्स पाहिले आहेत. तो ऑईल-ग्रीसचा गंध आला आणि या अठरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली… मी पाणावलेले डोळे लपवत होतो.. तिथं उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये एकजण असा होता, ज्यानं माझं ते दुकान आणि तो प्रवास जवळून पाहिला आहे. तो म्हणजे अशोकची भुमिका करणारा संतोष पाटील. त्यानं माझे पाणावलेले डोळे टिपले आणि आठवणीतल्या ‘किरणशेठ’ला घट्ट मिठी मारली.’

बाप-लेकीच्या हळव्या नात्याचा प्रवास

किरण माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. मुलगी झाली हो मालिकेत ते साकारत असलेल्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. बाप-लेकीच्या नात्यातले अनेक भावनिक प्रसंग मालिकेच्या यापुढील भागातही पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर सामाजिक संदेश देणारी ही मालिका अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन करणारी देखील ठरली आहे.

(Mulgi Zali Ho fame Actor Kiran Mane share his old automobile shop story on social media)

हेही वाचा :

PHOTO | एका शब्दाच्या भूमिकेने सुरु झाला अभिनयाचा प्रवास, प्रसंगी मंदिर बनले घर, अशी होती किशोर नांदलस्करांची सुरुवात…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.