फिल्मसिटीमध्ये मोठी आगीची घटना, गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटला भीषण आग
मुंबई येथील फिल्मसिटीमध्ये एक अत्यंत मोठी घटना घडलीये. गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना पुढे येतंय. आता याचे काही फोटो आणि व्हिडी देखील पुढे आले आहेत.
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडलीये. आता आग आटोक्यात आल्याचे सांगितले जातंय. गुम है किसी के प्यार में (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर आगीची घटना घडलीये. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाहीये. सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, अजून आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून टीआरपीमध्ये (TRP) गुम है किसी के प्यार में ही मालिका टाॅपमध्ये असून अनुपमा मालिकेला टीआरपीमध्ये ही मालिका बऱ्याच वेळा मागे टाकते.
रिपोर्टनुसार गुम है किसी के प्यार या मालिकेच्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट केला जात होता, ज्यामध्ये आग लागण्याचा सीन होता. मात्र, यादरम्यानच निष्काळजीपणामुळे सेटला आग लागली. इतकेच नाहीतर सेटवरील साहित्यही जळून खाक झाले आहे. आगीमुळे मोठे नुकसान मालिकेच्या निर्मात्यांचे झाल्याचे सांगितले जात आहे.
गुम है किसी के प्यार मेंच्या सेटवर आग लागल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या आगीत मालिकेच्या सेटवरील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये आणि कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शोच्या सेटवर लागलेल्या आगीचे व्हिडिओ आता सोशल मीडियाव तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आग लागल्यानंतर लोक आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आकाशात काळा धूरही दिसत आहे. गुम है किसी के प्यार में या मालिकेच्या सेटवरील व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
गुम है किसी के प्यार में ही मालिका गेल्या काही दिवसांपासून धमाका करताना दिसत आहे. सई, विराट आणि पत्रलेखा हे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. मालिकेमध्ये आता सई आणि विराट यांच्या मुलांची एन्ट्री झालीये. मात्र, पत्रलेखा ही सई हिच्याबद्दल तिच्या मुलांच्या मनात भीती निर्माण करते. आता होळी सेलिब्रेशन गुम है किसी के प्यार में मालिकेमध्ये सुरू आहे.
विराट हा सर्वांसमोर सई आपली पत्नी असल्याचे म्हणतो. हे पत्रलेखाला अजिबात आवडत नाही. विशेष म्हणजे काकू देखील आता सईचा सपोर्ट करताना दिसत आहे. मात्र, विराटची आई ही पत्रलेखाच्या सपोर्टमध्ये आहे. मालिकेमध्ये हे सर्व सुरू असतानाच आता मालिकेच्या सेटला आग लागलीये. पुढे येणाऱ्या मालिकेच्या भागांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जातंय.