Video | भालाफेकीत सुवर्ण पटकावणाऱ्या नीरज चोप्राला जेव्हा मुलीला प्रपोज करायला सांगितलं जातं, पाहा रोमँटिक व्हिडीओ

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. त्याने इतिहास रचून प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे. नीरज जाहिराती, मासिके, टीव्ही शो आजकाल सर्वत्र चर्चेत आहेत.

Video | भालाफेकीत सुवर्ण पटकावणाऱ्या नीरज चोप्राला जेव्हा मुलीला प्रपोज करायला सांगितलं जातं, पाहा रोमँटिक व्हिडीओ
Neeraj Chopra
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:11 PM

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. त्याने इतिहास रचून प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे. नीरज जाहिराती, मासिके, टीव्ही शो आजकाल सर्वत्र चर्चेत आहेत.

कौन बनेगा करोडपती (KBC13) नंतर आता नीरज (Neeraj Chopra) डान्स रिअॅलिटी शो डान्स+6 (Dance+ 6) मध्ये दिसणार आहे. नीरज चोप्रा नुकताच डान्स प्लस 6च्या मंचावर आला होता. नीरजने देखील या शोमध्ये हजर राहून खूप धमाल केली आहे.

धमाल करताना दिसला नीरज

दरम्यान, नीरजच्या रिअॅलिटी शोमध्ये धमाल मस्तीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून, असा अंदाज लावला जाऊ शकतो की, नीरज रिअॅलिटी शो डान्स+ 6च्या मंचावर आगामी भागामध्ये खूप धमाल करेल. याशिवाय, तो येथे शोची परीक्षक शक्ती मोहन हिला प्रपोज देखील करणार आहे.

नीरजचा रोमँटिक अंदाज चर्चेत

या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, नीरज चोप्रा शक्ती मोहनला त्याच्या स्वतःच्या शैलीत प्रपोज करत आहे. आगामी भागात हे दाखवले जाईल की प्रथम राघव शक्तीला आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण, या नंतर शक्ती स्वतः नीरजला तिला स्टेजवर येऊन प्रपोज कसा करतात हे दाखवण्याची विनंती करते.

नीरजने शक्ती मोहनला केला प्रपोज

अशा स्थितीत नीरज चोप्रा याने शक्ती मोहन हिला त्याच्या स्वतःच्या खास शैलीत राष्ट्रीय टीव्हीवर प्रपोज केले. तो म्हणतो, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाला आहे, मला माहित आहे नाही की चांगले जेवण कसे बनवतात, मी वेळ देखील देऊ शकत नाही’. नीरजची ही अनोखी शैली पाहून तिथे उपस्थित सर्व लोक टाळ्या वाजवू लागतात.

पाहा व्हिडीओ :

पदकानंतर वाढली फॅन फॉलोइंग

आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांना नीरज चोप्राची ही शैली खूप आवडली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे.

नीरजची ‘सुवर्ण’ खेळी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं होतं.

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.