Mazhi Tuzhi Reshimgaath: कोण आहे परीचा खरा बाबा? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नवीन एण्ट्री

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे. ही व्यक्तिरेखा नेहाच्या पहिल्या नवऱ्याची आहे. अविनाश असं त्याचं नाव असून चौधरी कुटुंबाच्या आनंदात तो विरजण घालणार आहे.

Mazhi Tuzhi Reshimgaath: कोण आहे परीचा खरा बाबा? 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवीन एण्ट्री
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवीन एण्ट्रीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:37 PM

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा (Prarthana Behere) आणि यशची (Shreyas Talpade) जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचा धूमधडाक्यात विवाहसोहळा पाहायला मिळाला. नेहा आणि यशाच्या लग्नामुळे चौधरी कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच त्यांच्या आनंदात विरजण पडणार आहे. नेहा आणि यशच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी एका नवीन व्यक्तिरेखेची मालिकेत एण्ट्री झाली आहे. ही व्यक्तिरेखा आहे नेहाच्या पहिल्या नवऱ्याची. नुकतंच मालिकेत अविनाशची झलक पाहायला मिळाली. अविनाश त्याला परीसाठी ड्रायव्हर म्हणून अपॉईंट केलं असल्याचं सांगतो. अविनाश हा दुसरा तिसरा कोणी नसून नेहाचा पहिला नवरा आहे.

त्यामुळे आता परी आणि नेहाच्या सुखी आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे. तेव्हा त्यांची आयुष्य बदलणार की यश या वादळातून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरेल. अविनाशची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय. या भूमिकेबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे आणि या मालिकेत एका रंजक वळणावर माझी महत्वपूर्ण भूमिकेत एण्ट्री झाली याचा मला खूप आनंद आहे. ही भूमिका आहे नेहाचा पहिला पती आणि परीचा बाबा अविनाशची. अविनाशला बघून नेहाची काय प्रतिक्रिया असेल आणि अविनाशचा नेहा आणि परीच्या आयुष्यात परत येण्याचा हेतू नक्की काय आहे हे प्रेक्षकांना पाहायला आवडेल.”

हे सुद्धा वाचा

नुकताच या मालिकेत नेहा आणि यशचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजामस्ती हे सर्व तर प्रेक्षकांनी पाहिलंच, पण सोबत यश आणि नेहाचा लग्नसोहळादेखील डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला. या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात नेहा आणि यशने आपली पहिली वटपौर्णिमा साजरी केली. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभु दे अशी प्रार्थना करतो. त्यानंतर आता मालिकेत अनेक रंजक घडामोडी घडणार आहेत. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.