Video | पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफचा सिद्धार्थ शुक्लाशी संवाद, पाहा काय म्हणाला अभिनेत्याचा आत्मा?

गेल्या वर्षी, पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफने (Steve Huff) सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी संवाद साधला होता. सुशांतच्या काही चाहत्यांनी त्यांना या सत्राची विनंती केल्यानंतर त्यांनी हा कथित संवाद साधला होता. त्याचप्रमाणे, या वर्षी, काही चाहत्यांनी स्टीव्हला सिद्धार्थ संबंधी विचारले आहे.

Video | पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफचा सिद्धार्थ शुक्लाशी संवाद, पाहा काय म्हणाला अभिनेत्याचा आत्मा?
Sidharth Shukla
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 10:59 AM

मुंबई : ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे सह-स्पर्धक, मित्र आणि सह-कलाकार या घटनेमुळे अतिशय शॉकमध्ये आहेत. त्याचे चाहते अजूनही या घटनेवर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नाहीयेत. चाहते त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडिया पेजवर शेअर करतात.

गेल्या वर्षी, पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफने (Steve Huff) सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी संवाद साधला होता. सुशांतच्या काही चाहत्यांनी त्यांना या सत्राची विनंती केल्यानंतर त्यांनी हा कथित संवाद साधला होता. त्याचप्रमाणे, या वर्षी, काही चाहत्यांनी स्टीव्हला सिद्धार्थ संबंधी विचारले आहे. यावेळी त्याने दावा केला आहे की, त्याने सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशीदेखील तीन दिवसांच्या सत्रात संवाद साधाल होता.

हफने साधला सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद

2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थचे निधन झाले आणि अहवालांनुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता. हफने काही दिवसांपूर्वी त्याचे ‘सोल स्पीकिंग’ सेशन केले आणि हा व्हिडीओ त्याच्या यूट्यूब चॅनेल हफ पॅरानॉर्मलवर अपलोड केला आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकतो की, स्टीव्ह हफ त्याच्या डिव्हाईसद्वारे सिद्धार्थशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तो कथित आत्म्याला प्रश्न करतो, “तू आता कुठे आहेस?”, ज्याला एक आवाज ऐकू येत आहे, “मी आलो आहे हफ.. मला माझा कुत्रा हवा आहे.”

त्यानंतर तो आत्म्याला तुझ्या आईला काही संदेश द्यायचा आहे का, असा प्षण विचारतो. त्यावर तो आवाज म्हणाला, “मी मृत आहे”. जेव्हा स्टीव्हने प्रियजनांसाठी कोणता संदेश आहे का?, असे विचारले तेव्हा तो आवाज म्हणाला, “मी तुमचे अश्रू नक्की पुसेन.”

कसा झाला मृत्यू?

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया  आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा :

Little Kiara : ‘ही’ लहान मुलगी अभिनयात कियारा आडवाणी पेक्षाही वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bell Bottom : अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखवणार जलवा, या दिवशी होईल स्ट्रीमिंग

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.