Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

देशभरामध्ये गाजलेला रिअॅलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चे सीझन नुकताच संपला असून रूबीना दिलैक शोचे विजेता ठरली आ

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:46 AM

मुंबई : देशभरामध्ये गाजलेला रिअॅलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चे सीझन संपले असून रूबीना दिलैक शोचे विजेता ठरली आहे. नुकताच राखी सावंतने (Rakhi Sawant) मुंबईतील अंधेरी भागातील रेस्टॉरंटमध्ये बिग बॉस 14 च्या घरातील सदस्यांसाठी एका खास पार्टीचे आयोजित केले होते. (Rakhi Sawant hosted a party for the members of Bigg Boss 14)

त्या पार्टीत विकास गुप्ता (Vikas Gupta), सोनाली फोगट (Sonali Phogat), विंदू दारा सिंह (Vindu Dara Singh), राहुल महाजन (Rahul Mahajan), निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि जन कुमार सानू (Jaan Kumar Sanu) सहभागी झाले होते. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण जे बिग बॉसच्या घरातमध्ये शिव्या देत होते आणि घरामध्ये ज्यावेळी यांचे आणि राखी सावंतचे भांडण व्हायचे.

rakhi sawant 1

त्यावेळी हे सर्व म्हणायचे की, शोच्या बाहेर आल्यावर राखीचे तोंड देखील बघणार नाही आणि आता राखीसोबत पार्टी करताना दिसत असल्यामुळे  हा शो स्क्रिप्टेड असल्याचा आरोप आता चाहत्यांकडून करण्यात येत आहे. जरी असे सांगितले जात असेल की, हा रिअॅलिटी शो आहे. मात्र, या पार्टीमुळे शो स्क्रिप्टेड असल्याचे म्हटंले जात आहे.

राखी सावंत 13 सीझनची स्पर्धकही होती, पण बिग बॉस 14 मध्ये मनोरंजक करण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी राखी सावंत यांना वाईल्ड कार्ड एन्ट्री दिली होती. घरात राहून राखीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त राखी सावंतचे घरातील सदस्यांसोबत भांडणे केली होती. त्यामध्ये निक्की तांबोळी, राहुल महाजन, सोनाली फोगट हेही होते. बिग बॉस सीझन 14 मध्ये घरातीस सदस्यांना राखीने शिवीगाळ देखील केला होता.

बऱ्याच भांडणामध्ये घरातील सदस्यांच्या कुटुबियांना देखीलमध्ये ओढण्यात आले होते. राखी सावंतच्या या पार्टीचे काही फोटोही समोर आले आहेत. त्यामध्ये सर्वजन मज्जा करताना दिसत आहेत. बिग बॉस हा रिअॅलिटी शो नसून स्क्रिप्टेड शो असल्याचे अनेकदा आरोप झाले आहेत आणि राखीच्या या पार्टीमुळे तर आता परत एकदा चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित बातम्या : 

श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

Miss world 2017 : मानुषी छिल्लर ‘या’ चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना विरोधात वॉरंट जारी , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

(Rakhi Sawant hosted a party for the members of Bigg Boss 14)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.