Rakhi Sawant | ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या राखीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान!

'बिग बॉस 14' मधून बाहेर पडल्यानंतर एकीकडे इतर स्पर्धक विजयाचा उत्सव साजरा करत आहेत, तर दुसरीकडे ‘बिग बॉस’ स्पर्धक , अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात खूप मोठे वादळ आले आहे.

Rakhi Sawant | ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या राखीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान!
राखी सावंत
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 10:35 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ मधून बाहेर पडल्यानंतर एकीकडे इतर स्पर्धक विजयाचा उत्सव साजरा करत आहेत, तर दुसरीकडे ‘बिग बॉस’ स्पर्धक , अभिनेत्री राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आयुष्यात खूप मोठे वादळ आले आहे. राखी सावंतची सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे (Rakhi sawant mother fighting with cancer actress shares photo).

सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या राखी सावंतने तिच्या आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आजारी आईचीच्या वेदना या स्पष्टपणे दिसून येत आहेत. राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले आणि तिच्या प्रियजनांना तिच्या आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. फोटो शेअर करताना राखीने लिहिले की, “प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे.” राखी सावंतची आई जया यांच्या पित्ताशयामध्ये खूप मोठी गाठ असल्याचे कळते आहे.

राखीचे भावनिक आवाहन!

राखीच्या हितचिंतकांनी, चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या लोकांनी या पोस्टवर कमेंट करत, राखीच्या आईला लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना केली आहे. विकास गुप्ता, जसलीन मथारू, पुनीश शर्मा, सोफिया हयात, कनिका कपूर सारखे राखीचे अनेक मित्र-मैत्रिणी तिच्या आईला लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करताना दिसले (Rakhi sawant mother fighting with cancer actress shares photo).

…म्हणून सोडले ‘बिग बॉस 14’चे घर!

सध्या राखीच्या आईची केमोथेरपी सुरु आहे. राखी सावंत ‘बिग बॉस 14’ च्या पहिल्या 5 फायनलिस्टपैकी एक होती, पण जेव्हा तिच्या समोर 14 लाख घेऊन शोमधून बाहेर पडण्याची ऑफर आली, तेव्हा तिने पटकन ती स्वीकारली. ही बक्षीस रक्कम घेतल्यानंतर राखीने सलमान खानलाही सांगितले होते की, ही रक्कम ती आपल्या आईच्या उपचारांसाठी वापरेल. या 14 लाख रुपयांसाठी राखी आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये चुरस होती. मात्र, ही संधी गमवल्यानंतर निक्की तांबोळीनेही असे म्हटले होते की, राखी सावंत हिला या पैशांची जास्त गरज असल्याने, ते 14 लाख रुपये गमावल्याबद्दल मला काहीही खेद वाटत नाही.’

राखी म्हणजे मनोरंजनाचा तडका

टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. मात्र, या मागील कारण कळताच चाहत्यांनी देखील राखीचे कौतुक केले. यावर्षी या कार्यक्रमाची विजेती रुबीना दिलैक ठरली, तर राहुल वैद्य दुसर्‍या क्रमांकावर आणि निक्की तांबोळी तिसर्‍या क्रमांकाचे विजेते ठरले.

(Rakhi sawant mother fighting with cancer actress shares photo)

हेही वाचा :

राधिका, शनाया आणि गुरुनाथ घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार

आदेश बांदेकरांच्या मुलाचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण, मालिकेचे नावंही ठरलं

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.