कोण ठरेल ‘Khatron Ke Khiladi 11’चा विजेता? राखी सावंतने घेतले ‘या’ स्पर्धकाचे नाव!

खतरों के खिलाडी सीजन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोची तयारी सध्या सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 14’चे अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.

कोण ठरेल ‘Khatron Ke Khiladi 11’चा विजेता? राखी सावंतने घेतले ‘या’ स्पर्धकाचे नाव!
राखी सावंत
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 1:25 PM

मुंबई : खतरों के खिलाडी सीजन 11 (Khatron Ke Khiladi 11) या रिअॅलिटी शोची तयारी सध्या सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 14’चे अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, जेव्हा ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) हिला विचारले गेले की, तिच्यानुसार हा शो कोण जिंकू शकेल?  हे विचारताच त्यांनी रुबीना दिलैक हिचा पती-अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shulka) याचे नाव घेतले (Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11).

अभिनव शुक्ला जिंकू शकतो हा शो!

‘बिग बॉस सीझन 14’मध्ये अभिनव शुक्लाची कामगिरी खूप चमकदार होती. त्याने या शोमध्ये केवळ अनेक कठीण टास्क करून दाखवले नाहीत तर, शोमध्येही तो बराच काळ टिकून राहिला. राखीने आपल्या स्टाईलमध्ये म्हटले की, अभिनव शुक्ला खूप स्ट्राँग आहे आणि तो जिंकू शकतो, असे तिला वाटते. तसेच राखीने असेही म्हटले आहे की, अभिनव कोणालाही घाबरत नाही आणि त्याला गिर्यारोहण करण्याचा खूप अनुभव आहे, ज्यामुळे तो हा शो जिंकू शकतो.

दिव्यांका, विशालबद्दल राखी म्हणते…

राखीने हेही सांगितले की, अभिनव शुक्लाचे स्वप्न आहे की, एके दिवशी तो एव्हरेस्टवर सर करेल. राखी सावंत म्हणाली की, या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) तिची आवडती स्पर्धक आहे. इतर स्पर्धकांबद्दल विचारले असता राखी म्हणाते की, तिला अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्य सिंग देखील आवडतात. पण, तरीही अभिनवमध्ये जिंकण्याची क्षमता आहे (Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11.

राहुल वैद्य का गेला माहित नाही?

राखीने श्वेता तिवारीचे कौतुक करताना म्हटले की, सर्व अडचणी असूनही ती एक मजबूत स्पर्धक आहे. त्यानंतर राखी बिग बॉसची तिची प्रतिस्पर्धी निक्की तंबोलीबद्दल बोलताना म्हणाली, ‘निक्कीसुद्धा खूप तगडी स्पर्धक आहे, पण कधीकधी ती टास्क करताना घाबरत असते.’ यावेळी राखीने निक्कीच्या भावाच्या अचानक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राहुल वैद्यने या कार्यक्रमात भाग घेतला असल्याचे कळताच राखी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाले, ‘राहुल वैद्य या शोमध्ये का गेला, मला माहिती नाही. त्याला पाठीच्या खूप समस्या आहेत. मी राहुल वैद्य याच्यासाठी प्रार्थना करीन, की तो नेहमी सुखरूप राहावा.’

(Rakhi Sawant Says Abhinav Shukla will win Khatron Ke Khiladi 11)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगना रनौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

पाकिस्तान सरकारची कारवाई, दिलीपकुमार-राज कपूर यांच्या हवेली मालकांना अखेरची नोटीस!

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.