Yog Yogeshwar Jay Shankar: ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग; ‘स्वामिनी’ फेम सृष्टी पगारेची एण्ट्री

कलर्स मराठी वाहिनीवरील 'स्वामिनी' मालिकेत रमा बनून मराठी प्रेक्षकांच्या मनावर जिने अधिराज्य गाजवलं, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे (Srishti Pagare) मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Yog Yogeshwar Jay Shankar: 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग; 'स्वामिनी' फेम सृष्टी पगारेची एण्ट्री
Yog Yogeshwar Jay Shankar: 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेचा रक्षाबंधन विशेष भागImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 12:33 PM

श्रावण महिन्याचं हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते. त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. याच बरोबर येते संततीरक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा. या पूजेचं महत्व देखील काही खास आहे. लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ (Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचं महात्म्यदेखील गोष्टीच्या रूपात सांगितलं जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एण्ट्री होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ मालिकेत रमा बनून मराठी प्रेक्षकांच्या मनावर जिने अधिराज्य गाजवलं, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे (Srishti Pagare) मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचं कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी आहे. तिचा भाऊ परत येणार आहे असा तिला विश्वास आहे आणि तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का, तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का, बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील हे सगळं मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागामध्ये बघायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, “मी या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळत आहे हे माझं भाग्य आहे. कामाबरोबर आमची सेटवर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि ही मालिका नक्की बघा”. योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.