फेमस आरजे करणार बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
RJ Sumit may Inter in Bigg Boss Marathi by Wildcard Entry : बिग बॉस मराठीमध्ये प्रसिद्ध आरजे सहभागी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कोण आहे हा आरजे? सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय आहे? व्हायरल झालेल्या व्हीडिओत नेमकं काय? वाचा सविस्तर...
बिग बॉस मराठीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये भन्नाट स्पर्धक आहेत. त्यामुळे सोशल मीडियासह महाराष्ट्रभर चर्चा होत असते. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट केला जातोय. आर जे सुमितदेखील इन्स्टाग्रामवर वेगवेगळे रील शेअर करत असतो. बिग बॉसचा हा सिझन सुरु झाल्यापासून तो बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्याबाबतचे व्हीडिओ बनवतो. त्याच्या या व्हीडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण त्याच्या व्हीडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चाहते त्याच्याकडे एक मागणी करत आहेत.
आरजे सुमित बिग बॉसच्या घरात दिसणार?
बिग बॉस खेळाशी संबंधित सुमितच्या व्हीडिओवर नेटकरी कमेंट करत आहेत. तुला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल. दादा खरंच तुम्हाला 100% बिग बॉसमध्ये आम्हाला बघायला आवडेल. सो प्लीज ट्राय करा, अशा कमेंट सुमितच्या व्हीडिओवर पाहायला मिळतात. त्यानंतर आरजे सुमितनेही एक व्हीडिओ शेअर करत बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे आरजे सुमित बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हीडिओत नेमकं काय?
तुमच्या सगळ्याचं प्रेम बघून खूप भारी वाटतंय… प्रत्येक व्हीडीओच्या खाली तुम्ही लोकांनी कमेंट केली आहे की भावा… बिग बॉसच्या घरात जावं लागतंय, वाईल्ड कार्ड एन्ट्री घ्यावी लागतीय, अशा व्हीडिओच्या खाली तुम्ही लोक करताय. पण जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की बिग बॉसच्या घरात मी जायला पाहिजे. तर या व्हीडिओवर कमेंट करा. बिग बॉस मराठी, कलर्स मराठी, रितेश देशमुख आणि केदार शिंदे यांना मेन्शन करा. जर तुमचा हा मेसेज बिग बॉसच्या टीमपर्यंत पोहोचला तर आपली वाईल्ड कार्ड एन्ट्री फिक्स आहे. लावा ताकद…, असा व्हीडिओ सुमितने शेअर केलाय.
View this post on Instagram
सुमित आरजे अर्थात रेडिओ जॉकी आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे रील्स तरूणाईमध्ये फेमस आहेत. वैभव चव्हाण आणि धनंजय पोवार या दोघांना सुमित सपोर्ट करताना दिसतो. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील वादावरही सुमिने एक रील शेअर केलं होतं. पण आता स्वत: सुमितच बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.