Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री करताच संग्राम चौगुलेने घेतला निक्कीसोबत पंगा

Sangram Chougule in Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा हा नवा सिझन चांगलाच गाजतो आहे. आता या 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवा सदस्य सामील झाला आहे. बॉडीबिल्डर संग्राम चौगुले 'बिग बॉस मराठी'च्या घरात पोहोचला आहे, त्याची स्टॅटर्जी काय आहे? वाचा सविस्तर...

Video : 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री करताच संग्राम चौगुलेने घेतला निक्कीसोबत पंगा
बिग बॉस मराठीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 6:48 PM

छोटा पुढारी घन: श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. त्याला घरातल्या पहिल्या दिवसापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्याचा पहिला दिवसच टास्कपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी टास्कमध्ये सदस्यांसोबत वाद घालताना संग्राम दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज जादुई विहिरीत कोण पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच पहिल्याच दिवशी संग्राम चौगुलेने निक्की तांबोळीशी पंगा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

संग्राम निक्कीशी भिडला

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी संग्रामच्या कृतीचं समर्थन केलं आहे. तसंच निक्कीशी कुणीतरी भिडायला पाहिजे, ते तू करतो आहेस, असं नेटकरी म्हणत आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

संग्राम निक्कीशी भिडल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. खतरनाक संग्रामभाऊ…, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. हेच तर पाहिजे होतं… आणि हे फक्त संग्रामने करून दाखवलं. पहिल्याच दिवशी मन जिंकलस भावा… जबरदस्त, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. खतरनाक चौघुले सर निक्कीला चांगला धडा शिकवलात, अशीही कमेंट करण्यात आली आहे.

अंकिता आणि धनंजयमधलं संभाषणही सध्या चर्चेत आहे. डीपी दादा तुम्ही नॉमिनेशनमध्ये होतात तेव्हा एक वाक्य बोलला होतात विश्वासाबद्दल. मला पलटणारी लोक आवडत नाहीत. मी जेव्हा घरातून जाणार होते तेव्हा मी अभिजीतला म्हणाले होते, ‘स्टँड घे.. पलटू नको’, असं अंकिता धनंजय पोवारला म्हणते. त्यावर डीपी तिला उत्तर देतो.हा ग्रुप सगळ्यात पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार आहे, असं डीपी म्हणतो.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.