AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satyavan Savitri: यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची कथा; ‘सत्यवान सावित्री’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाभारताच्या वनपर्वातील एक उपकथानक म्हणून आलेली सत्यवान-सावित्रीची (Satyavan Savitri) गोष्ट सर्वांनाच माहित आहे. परंतु ही सावित्री कोण होती, कशी होती, तिची आणि सत्यवानाची भेट कशी झाली, तिच्याकडे असं कोणतं सामर्थ्य होतं की ज्यामुळे तिने सत्यवानाचे प्राण परत आणले, याचं आजवर प्रत्येकालाच कुतूहल आहे.

Satyavan Savitri: यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची कथा; 'सत्यवान सावित्री' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Satyavan SavitriImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 7:45 AM

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची (Savitri) गोष्ट लवकरच प्रेक्षकांना झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. ‘सत्यवान सावित्री’ (Satyavan Savitri) असं या मालिकेचं नाव आहे. झी मराठी वाहिनीवर भव्य-दिव्यपणे सादर होणारी ही मालिका प्रेक्षकांना सत्यवान-सावित्रीच्या मनोहारी विश्वात घेऊन जाणार आहे. सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची आणि निष्ठेची ही कथा आहे. या मालिकेचं दृश्यरुप प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारं असणार आहे.

महाभारताच्या वनपर्वातील एक उपकथानक म्हणून आलेली सत्यवान-सावित्रीची गोष्ट सर्वांनाच माहित आहे. परंतु ही सावित्री कोण होती, कशी होती, तिची आणि सत्यवानाची भेट कशी झाली, तिच्याकडे असं कोणतं सामर्थ्य होतं की ज्यामुळे तिने सत्यवानाचे प्राण परत आणले, याचं आजवर प्रत्येकालाच कुतूहल आहे. अश्वपती राजाची लाडकी कन्या ते सत्यवानाशी लग्न झाल्यावर सासरच्या कुळाचा सन्मान वाढवणारी आदर्श सून हा प्रवास सावित्रीसाठी अतिशय खडतर होता. यासाठी तिला असंख्य संकटांचा सामना करावा लागला.

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी निर्धार आणि योग्य निर्णय घ्यावा लागतो. तसेच जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते, हे आपल्याला सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीतून अनुभवता येणार आहे. या मालिकेची निर्मिती द फिल्म क्लिक यांनी केली असून आदित्य दुर्वे आणि वेदांगी कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सत्यवान-सावित्रीचं असीम प्रेम आणि सावित्रीचा सामान्यातून असामान्य प्रवास कसा होता, हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सत्यवान-सावित्री ही मालिका झी मराठीवर 12 जूनपासून संध्याकाळी 7 वाजता येत आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.