AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishal Kotian | चित्रपटाच्या तिकिटांची काळाबाजारी करून भरली शाळेची फी, आता ‘बिग बॉस’मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेता विशाल कोटियानबद्दल

अभिनेता विशाल कोटियानने ‘बिग बॉस 15’च्या स्टेजवर धमाका केला आणि त्याच वेळी त्याने स्टेजवरच त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. विशालचे व्यक्तिमत्व पाहून सलमान खानही खूप प्रभावित झाला आहे.

Vishal Kotian | चित्रपटाच्या तिकिटांची काळाबाजारी करून भरली शाळेची फी, आता ‘बिग बॉस’मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेता विशाल कोटियानबद्दल
Vishal Kotian
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 8:09 AM

मुंबई : अभिनेता विशाल कोटियानने ‘बिग बॉस 15’च्या स्टेजवर धमाका केला आणि त्याच वेळी त्याने स्टेजवरच त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. विशालचे व्यक्तिमत्व पाहून सलमान खानही खूप प्रभावित झाला आहे. स्टेजवर त्याने सलमान खानला आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली आणि सलमान खानने लगेच त्याला मिठी मारली.

विशाल कोटियान एक लोकप्रिय दूरदर्शन अभिनेता आहे, त्याने ‘अकबर का बल बीरबल’, ‘महाभारत’, ‘देवो के देव महादेव’ आणि ‘श्री आदि मानव’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करून भरली शाळेची फी

विशाल कोटियान आपल्या संघर्षाबद्दल सांगताना म्हणाला की, सलमान खान त्याच्यासाठी पूर्णपणे द्रोणाचार्य आहे आणि त्याच्यामुळेच त्याने आयुष्यात प्रगती केली आहे. एक किस्सा सांगताना विशाल म्हणाला, ‘जेव्हा तो चौथीत होता, त्यावेळी सलमान खानचा ‘वीरगती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या काळात विशालने सलमान खानच्या चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकून स्वतःची शाळेची फी भरली होती. जेव्हा तो 9व्या इयत्तेत आला तेव्हा सलमान खानचा ‘बंधन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

लहानपणी पाहिलं अठराविश्व दारिद्र्य

विशाल कोटियान पुढे म्हणाला की, तो खूप गरीब कुटुंबातून आला आहे आणि तो मुंबईत एका चाळीत राहत होता. त्याच्या कुटुंबाची स्थिती इतकी चांगली नव्हती की, तो त्याच्या शाळेची फी भरू शकेल. पण त्याने कधीही त्याच्या गरिबीला स्वप्नांच्या पुढे जाऊ दिले नाही.

विशालने सलमानला असेही सांगितले की, तो लहान असताना त्याला नेहमी वाटत होते की, तो त्याचे स्वप्न पूर्ण करेल. त्याने ते दिवसही आठवले जेव्हा लोक मोठी स्वप्न पाहण्यासाठी विशालला टोमणे मारत असत. आपली वेदना व्यक्त करताना विशाल म्हणाला, ‘मी अशा भागातून आलो आहे, जिथे असे म्हटले जाते की ड्रायव्हरचा मुलगा ड्रायव्हर बनेल. पण बघा, आज एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्याचा मुलगा तुमच्या सर्वांसमोर उभा आहे.’

अभिनेता होण्याचे स्वप्न

विशाल स्वप्न पाहण्याबद्दल आपले मनमोकळे विचार शेअर करताना विशाल म्हणाला, ‘मी लहान असताना मी नेहमी हिरो बनण्याचे स्वप्न पाहिले होते, किंवा चित्रपट पाहिल्यानंतर लोक असे म्हणत असत की स्वप्ने अशी असली पाहिजेत, जी सत्यात उतरतील. मी माझ्या स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवलं आहे आणि मी एक अभिनेता म्हणून लोकांसमोर उभा आहे. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.’

मिथुनदांसोबत केलेय काम

विशाल कोटियानने 1998 मध्ये टीव्ही शो ‘दिल विल प्यार व्यार’ पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, त्याने ‘फॅमिली नंबर 1’, ‘शश.. कोई है’, ‘दिल है फिर भी हिंदुस्तानी’, ‘ऐसा देश है मेरा’, ‘सीआयडी’ आणि ‘प्यार में ट्विस्ट’ यासह अनेक टीव्ही शो केले. विशाल कोटियानने 2008 मध्ये मिथुन चक्रवर्तीसोबतही काम केले होते.

हेही वाचा :

Aryan Khan : ड्रग्स प्रकरण; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पोहोचला तुरुंगात, समोर आले फोटो

Arya Vora : ‘देवों के देव महादेव’ फेम आर्या वोराचा खास लूक, नवरात्रीनिमित्त शेअर केले फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.