सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर दिसली शहनाझ गिल, अभिनेत्याला देणार अनोखी श्रद्धांजली!

टीव्ही सुपरस्टार सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) अचानक जाण्याने त्याचा प्रत्येक चाहता दु:खी झाला होता. अभिनेता कारकिर्दीत यशाच्या शिखराकडे वाटचाल करत होता. मात्र, अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याच्या जाण्यानंतर त्याची गर्लफ्रेंड शहनाज गिल (Shehnaaz Gill) पूर्णपणे एकाकी राहायला लागली होती.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर दिसली शहनाझ गिल, अभिनेत्याला देणार अनोखी श्रद्धांजली!
Sidhharth-Shehnaaz
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 4:51 PM

मुंबई : टीव्ही सुपरस्टार सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) अचानक जाण्याने त्याचा प्रत्येक चाहता दु:खी झाला होता. अभिनेता कारकिर्दीत यशाच्या शिखराकडे वाटचाल करत होता. मात्र, अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याच्या जाण्यानंतर त्याची गर्लफ्रेंड शहनाज गिल (Shehnaaz Gill) पूर्णपणे एकाकी राहायला लागली होती. ती ना सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्हिटी होती ना मीडियाच्या कॅमेरासमोर. ती पूर्णपणे तिच्याच विश्वात हरवून गेली होती. आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर 56 दिवसांनी तिने पहिली इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. ही पोस्ट सिद्धार्थच्या चाहत्यांना नक्कीच भावूक करणार आहे.

अभिनेत्री शहनाज गिलने इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये ‘तू यंही है’ असे लिहिले आहे. सिद्धार्थ शुक्ला यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असे देखील लिहिले आहे. या फोटोमध्ये शहनाज सिद्धार्थसोबत हसताना दिसत आहे. हा फोटो सिद्धार्थ आणि शहनाजच्या बिग बॉसच्या दिवसांची आठवण करून देणारा आहे. ज्यांनी सिड-नाजची प्रेमकथा पाहिली असेल, त्यांना हे पोस्टर नक्कीच आवडेल.

शहनाज गिल सिद्धार्थ शुक्ला याच्या स्मरणार्थ काहीतरी खास घेऊन येणार आहे, जे ती उद्या दुपारी 12 वाजता रिलीज करणार आहे. ही श्रद्धांजली काय आहे हे आतापर्यंत कोणालाही माहित नाही, परंतु असे मानले जाते की ही एक प्रकारची सांगीतिक श्रद्धांजली असू शकते. ज्याद्वारे शहनाज गिल सिद्धार्थबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करणार आहे. शहनाजच्या या पोस्टवर तिचे आणि सिद्धार्थचे चाहते भरपूर कमेंट करत आहेत. शहनाजच्या श्रद्धांजलीची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकताच प्रदर्शित झाला पंजाबी चित्रपट

यापूर्वी शहनाज गिलचा पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. तिचा हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरु आहे, त्याची रेकॉर्डब्रेक कमाई देखील सुरूच आहे. या चित्रपटात शहनाजसोबत दिलजीत दोसांझ दिसला होता.

बिग बॉस शोदरम्यान सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यातील जवळीक वाढली होती. हा शो संपल्यानंतरही दोघेही एकमेकांसोबत राहिले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, हे दोन्ही जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. मात्र, सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शहनाज आणि सिद्धार्थ यांची भेट कशी झाली?

सिद्धार्थ आणि शहनाज ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून आले होते. शो दरम्यानच शहनाज सिद्धार्थच्या प्रेमात पडली. ती सिद्धार्थला हे अनेक वेळा सांगत असे. पण सिद्धार्थ यील नेहमी स्वतःची चांगली मैत्रीण मानत असे. दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांना शोमध्ये खूप आवडली आणि त्यांनी या जोडीला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

शोमधून बाहेर पडल्यानंतरही शहनाज अनेक मुलाखतींमध्ये म्हणायची की, तिला सिद्धार्थ आवडतो. पण नेहमीप्रमाणे सिद्धार्थने तिला मैत्रीण म्हटले. मात्र, अभिनेता नेहमीच असे म्हणत असे की, शहनाज त्याच्या खूप जवळ आहे. सिद्धार्थ आणि शहनाज पुन्हा एकदा म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले आणि दोघांच्या गाण्यांना प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा :

Aryan Khan Drug case : ‘हे सगळं दुखःद आहे…’, पुन्हा एकदा आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आला हृतिक रोशन

परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.