‘द कपिल शर्मा शो’च्या येणाऱ्या सीझनमध्ये दिसणार काही नवे चेहरे… नेटकरी म्हणाले सुनील ग्रोवर कधी येणार?

द कपिल शर्मा शो'चा पहिला सीझन 2016 मध्ये आला होता. कपिल शर्मा व्यतिरिक्त अर्चना पूरण सिंह, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह आणि चंदन प्रभाकर या शोचा महत्त्वाचा भाग आहेत. या शोची निर्मिती सलमान खान आणि कपिल शर्मा यांनी केली आहे.

द कपिल शर्मा शोच्या येणाऱ्या सीझनमध्ये दिसणार काही नवे चेहरे... नेटकरी म्हणाले सुनील ग्रोवर कधी येणार?
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 1:05 PM

मुंबई : बहुचर्चित ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) चा आणखी एक सीझन येणार आहे. यावेळी काही नवीन सदस्य शोमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा (Kapil Sharma) करत आहेत आणि दर आठवड्याला काही मोठे स्टार शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, आता कपिल शर्मा शोबद्दल एक वेगळीच मागणी केली जातंय. शोचे प्रेक्षक शोमध्ये सुनील ग्रोवरला (Sunil Grover) आणावे अशी, मागणी करताना दिसत आहेत.

कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर 2017 ला सुनीलने सोडला शो

द कपिल शर्मा शो’चा पहिला सीझन 2016 मध्ये आला होता. कपिल शर्मा व्यतिरिक्त अर्चना पूरण सिंह, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह आणि चंदन प्रभाकर या शोचा महत्त्वाचा भाग आहेत. या शोची निर्मिती सलमान खान आणि कपिल शर्मा यांनी केली आहे.सुनील ग्रोवर देखील या शोचा एक भाग होता, परंतु कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर त्याने 2017 मध्ये शो सोडला.

कपिल शर्माच्या शोमध्ये मोठ मोठ्या स्टार्सची भेट

कपिल शर्मा शोच्या टीमने नुकताच टोरंटोमध्ये एक शो केला. याचे अनेक फोटो समोर आले आहेत. येथे चंदन, सुमोना, कृष्णा अभिषेक, किकू शारदा कपिलसोबत दिसले. कपिल शर्माच्या शोमध्ये मोठमोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचतात. चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त इतर क्षेत्राशी संबंधित लोकही कपिल शर्माच्या शोमध्ये दिसतात. कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक नवीन स्टार्स देखील कायम येतात. शोमुळे कपिल अनेकदा वादातही सापडला आहे.