Indian Idol Marathi : ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर अशोक सराफ यांच्या येण्याने आठवणींना येणार उजाळा…

अशोक सराफ यांच्यासाठी गायलेली गाणी, त्यांनी सांगितलेले किस्से हे सगळं 4, 5 आणि 6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 'इंडियन आयडल मराठी' सोनी मराठी वाहिनीवर अनुभवता येणार आहे.

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ यांच्या येण्याने आठवणींना येणार उजाळा...
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 12:34 PM

मुंबई : ‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्नं घडवतो आहे. सध्या महाराष्ट्राला उत्तम 6 स्पर्धक मिळाले आहेत. आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहे अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) येणार आहेत.

चेहर्‍यावरील विनोदी हावभावांच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिनेता म्हणून जर कोणी अधिक काळ राज्य केले असेल, तर ते आहेत सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ. मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते त्यांनी फक्त विनोदी भूमिका नाहीत तर गंभीर भूमिकासुद्धा चोखपणे बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खट्याळ प्रियकराची भूमिका असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक मामांच्या येण्याने सुरांच्या मंचावर उत्साह पसरणार असून स्पर्धक अशोक सराफ यांच्यावरच चित्रीत झालेली गाणी साजरी करणार आहेत. सुरांच्या मंचावर गाण्यांसोबत आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि रसिकांसाठी हा भाग म्हणजे मेजवानी ठरणार आहे.

चेहर्‍यावरील विनोदी हावभावांच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिनेता म्हणून जर कोणी अधिक काळ राज्य केले असेल, तर ते आहेत सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ.  अशोक सराफ यांच्यासाठी गायलेली गाणी, त्यांनी सांगितलेले किस्से हे सगळं 4, 5 आणि 6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता ‘इंडियन आयडल मराठी’ सोनी मराठी वाहिनीवर अनुभवता येणार आहे.

संबंधित बातम्या

Gudhipadava : मराठमोळा साज करत अभिनेत्रींकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, पाहा फोटो…

Remo Dsouza Birthday : एकेकाळी खायचे वांदे असणारा रेमो डिसूझा आता आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा त्याचा संघर्षमय प्रवास…

Ajay Devgn: ‘सिंघम’ची कोट्यवधींची संपत्ती; एका चित्रपटासाठी घेतो तब्बल इतके कोटी रुपये मानधन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.