Star Pravah : स्टार प्रवाहच्या मालिकांमधील कलाकारांनी घेतली पडद्यामागच्या कलाकारांच्या कुटुंबाची भेट, पाहा काही आनंदी क्षण…

Star Pravah : आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा आणि मुरांबा मालिकेतील कलाकारांनी पडद्यामागच्या कलाकारांच्या घरी भेट दिली. तंत्रज्ञांच्या कुटुंबासाठीही आपल्या लाडक्या कलाकारांची ही भेट अविस्मरणीय ठरली.

Star Pravah : स्टार प्रवाहच्या मालिकांमधील कलाकारांनी घेतली पडद्यामागच्या कलाकारांच्या कुटुंबाची भेट, पाहा काही आनंदी क्षण...
स्टार प्रवाहचा परिवार जेव्हा पडद्यामागील कलाकारांच्या परिवाराला भेटतो..... Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 3:00 PM

मुंबई : परिवार (Family) असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा… स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिकांमधली प्रत्येक पात्र आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग आहे. प्रेक्षक घरबसल्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकारांना भेटत असतात. स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. दर्जेदार कार्यक्रमांचा हा डोलारा उभा करण्यात कलाकार आणि दिग्दर्शकांसोबतच तंत्रज्ञांचाही मोलाचा वाटा असतो. या मंडळींशिवाय प्रवाह कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही. कलाकारांना घरोघरी पोहचवणारी ही मंडळी मात्र पडद्यामागे राहून सूत्र हलवत असतात. याच सदस्यांना स्टार प्रवाहच्या कलाकारांनी दिलं एक खास सरप्राईज. आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte), रंग माझा वेगळा (Rang Majha Vegala), सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhnaje Nakki Kay Asat), फुलाला सुगंध मातीचा (Ya Phulala Sugandh Maticha) आणि मुरांबा (Muramba) मालिकेतील कलाकारांनी सेटवरील तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट घेतली.

एक दिवस शूटिंगला ब्रेक देत स्टार प्रवाहच्या कलाकारांनी टवरील तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट घेतली. दैनंदिन मालिका साकारण्यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबरच मोलाचं योगदान देणाऱ्या सेटवरील तंत्रज्ञांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन कलाकारांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली. पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा ही म्हण प्रचलित आहेच. मात्र आम्हीही तुमच्या परिवाराचा एक भाग आहोत ही भावनाच सुखावणारी होती. आपल्या परिवाराचं प्रेम नेमकं काय असतं हे त्यादिवशी आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा आणि मुरांबा मालिकेतील कलाकारांनी अनुभवलं. तर तंत्रज्ञांच्या कुटुंबासाठीही आपल्या लाडक्या कलाकारांची ही भेट अविस्मरणीय ठरली.

मनसोक्त गप्पा तर रंगल्याच मात्र थोरामोठ्यांना नमस्कार करताना जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणारा मंदार जाधव, गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मुरांबा मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर भावूक झाले होते.

आई कुठे काय करते मालिकेतील संजना,अनिरुद्ध आणि रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदारही या खास भेटीने भारावून गेल्या होत्या.

स्टार प्रवाह वाहिनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते. या आगळ्या वेगळ्या भेटीने नात्यातला गोडवा वाढला असणार हे नक्कीच. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार भेटीला येणार आहे. 3 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता हा दैदिप्यमान सोहळा प्रेक्षकाना पाहता येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संबंधित बातम्या

अमिताभ बच्चन यांनी हृषिकेशमध्ये केली गंगा आरती; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.