Aai Kuthe Kay Karte : अन् अखेर तो क्षण आला… अरुंधती सोडणार देशमुखांचं घर

अरुंधती देशमुखांचं घरही सोडणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात हा बदल बघायला मिळेल.

Aai Kuthe Kay Karte : अन् अखेर तो क्षण आला... अरुंधती सोडणार देशमुखांचं घर
अरुंधती- आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:33 PM

आयेशा सय्यद, मुंबई : सध्या ‘आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत अग्रस्थानी आहे. या मालिकेत काय घडतं, काय बिघडतं हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असतो. मालिकेतील अरुंधती (Arundhati) हे पात्र तर सध्या चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. अरुंधतीचा साधेपणा सगळ्यांच भावतोय. पण आता तुमची लाडकी अरुंधती बदलतेय. तिच्या जीवनात, राहणीमानात बरेच बदल होत आहेत. आता तर तिने एक महत्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे देशमुखांचं ‘समृद्धी’ (Samruddhi) हे घर सोडण्याचा. तिच्या या निर्णयानंतर मालिकेत बरेच बदल होतील. आता अरुंधतीचा हा निर्णय तिची मुलं आणि घरातील इतर मंडळी स्विकारतात का?, हे पाहणंही महत्वाचं असेल.

अरुंधती सोडणार देशमुखांचं घर

सध्या आई कुठे काय करते या मालिकेत सध्या मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. या मालिकेतील अरुंधती या पात्राच्या आयुष्यात सर्वच अर्थाने बदल होत आहेत. सध्या अरुंधती साडी सोडून पंजाबी ड्रेस घालताना बघायला मिळतेय आणि आता तर तुमची लाडकी अरुंधती देशमुखांचं घरही सोडणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात हा बदल बघायला मिळेल.

अरुंधती आणि आशुतोष केळकर कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांना तिथे एकत्र राहण्याचा प्रसंग येतो. तिथून घरी परतल्यावर अनिरुद्ध तिला आशुतोषसोबत राहिल्याबद्दल जाब विचारतो. त्याचा अरुंधतीला राग येतो आणि ती देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेते. “माझ्या मुलांसमोर माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला मला चालणार नाही”, असं ठणकावून सांगत ती सम्रृद्धी बाहेर जाण्यास निघते. यापुढे काय होणार हे आता आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

अरुंधतीच्या राहणीमानात बदल

तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमची लाडकी अरुंधती बदलली आहे. अरुंधती आता साडीत नाही तर ड्रेसमध्ये तुम्हाला पहायला मिळतेय. इथून पाठीमागे फक्त साडीत वावरणारी अरुंधती आता आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये घालताना दिसतेय. तिचं हे रुप पाहून तिचा मित्र आशुतोष केळकर अवाक झाला. अरुंधती आणि आशुतोष केळकर यांची आता चांगलीच गट्टी जमू लागली आहे. याची मैत्री दिवसेंदिवस फुलत चालली आहे. अरुंधती या पात्रात होणारा हा बदल तिच्या कक्षा रुंदावण्याचं उदाहरण आहे. तिच्यातला बदल अनेकांना भावतोय.

संबंधित बातम्या

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा Valentine’s Day! फोटो शेअर करत मलायला म्हणाली “तू माझा आहेस…”, तर अर्जुन म्हणतो…

Valentine’s Day : रुचिरा जाधव, विनय प्रतापराव देशमुख आणि सायली संजीव यांचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ प्रेक्षकांच्या भेटीला

Valentine’s Day : “तू लवकर घरी ये, आपण आपलं आयुष्य आणखी सुंदर बनवूया…”, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मानसी नाईकची पतीला आर्त साद

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.