‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबा हरपला, 29 व्या वर्षी अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

अभिनेता उज्ज्वल धनगरने 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकांत खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय 'क्राईम पेट्रोल', 'लक्ष्य' यासारख्या मालिकांमध्येही त्याने काम केले होते

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील खाशाबा हरपला, 29 व्या वर्षी अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
अभिनेता उज्ज्वल धनगर
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:52 AM

मुंबई : मालिका विश्वातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा युवा अभिनेता उज्ज्वल धनगर (Ujjwal Dhangar) याचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajya Rakshak Sambhaji) मालिकेत त्याने खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. (Swarajya Rakshak Sambhaji fame Marathi TV Actor Ujjwal Dhangar Dies of Heart Attack)

मराठी मालिकांमध्ये अभिनय

उज्ज्वल धनगर हा शहापूर तालुक्यातील सापगावचा रहिवासी होता. गेल्या 15 वर्षांपासून तो टिटवाळ्यात राहत होता. उज्ज्वलने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सोबतच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ यासारख्या मालिकांमध्येही त्याने काम केले होते. अनेक कार्यक्रमांचे निवेदनही त्याने केले आहे. उज्ज्वलच्या अकाली निधनाने सहकलाकारांवर शोककळा पसरली आहे.

छातीदुखीच्या त्रासानंतर रुग्णालयात

‘क्राईम पेट्रोल’ या हिंदी मालिकेचे शूटिंग उज्ज्वलने शनिवारी पूर्ण केले होते. रविवारी रात्री त्याने नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत जेवणही घेतले होते. मात्र सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या छाती आणि पोटात दुखायला लागले. त्यामुळे तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल झाला. अॅसिडिटीच्या शक्यतेमुळे औषध घेऊन तो घरी परतला. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तो रुग्णालयात गेला. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. टिटवाळा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंकार करण्यात आले.

उज्ज्वलच्या निधनाने त्याच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या सहकलाकारांवर सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अभिनेता गौरव मोरेकडून श्रद्धांजली :

संबंधित बातम्या :

अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर, पत्नी कादंबरीचे कोरोनामुळे निधन

कोरोनाने आणखी एक गुणी अभिनेता हिरावला, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

(Swarajya Rakshak Sambhaji fame Marathi TV Actor Ujjwal Dhangar Dies of Heart Attack)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.