Munmun Dutta | ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ला ‘व्हॅलेंटाईन्स’ दिवशीच बॉयफ्रेंडकडून मारहाण, आयुष्यातील ‘त्या’ घटनांमुळे पुरुषांबद्दल निर्माण झाला होता तिरस्कार!

2008 मध्ये मुनमुन आज इतकी प्रसिद्ध नव्हती. परंतु, या काळात ती बरीच चर्चेत आली होती. चित्रपट अभिनेता अरमान कोहलीशी असलेले तिचे नाते आणि वाद हे त्याचे कारण होते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच तिचा प्रियकर अरमान कोहलीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

Munmun Dutta | ‘तारक मेहता...’च्या ‘बबिता’ला ‘व्हॅलेंटाईन्स’ दिवशीच बॉयफ्रेंडकडून मारहाण, आयुष्यातील ‘त्या’ घटनांमुळे पुरुषांबद्दल निर्माण झाला होता तिरस्कार!
मुनमुन दत्ता
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 8:46 AM

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सर्व पात्रांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. हे सर्व कलाकार इतके लोकप्रिय झाले की, आता चाहते त्यांना खऱ्या नावाऐवजी सिरियलमधील पात्रांच्या नावांनी ओळखतात. या शोचे असेच एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘बबिता अय्यर’ (Babita), ज्यांना प्रत्येकजण ‘बबिता जीं’च्या नावाने ओळखतात. ही गोकुळधाम सोसायटीतील सर्वात स्टायलिश महिला आहे. ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) खऱ्या आयुष्यात बरीच धाडसी आहे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Babita Aka Munmun Dutta faced domestic violence).

पण तुम्हाला माहिती आहे का की, ही प्रसिद्धी मिळण्यापूर्वी मुनमुनला आयुष्यात अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. आज, आम्ही तुम्हाला मुनमुन दत्ताच्या जीवनातील अशाच काही घटनांविषयी सांगणार आहोत…

‘व्हॅलेंटाईन्स’ दिनी बॉयफ्रेंडने केली मारहाण!

2008 मध्ये मुनमुन आज इतकी प्रसिद्ध नव्हती. परंतु, या काळात ती बरीच चर्चेत आली होती. चित्रपट अभिनेता अरमान कोहलीशी असलेले तिचे नाते आणि वाद हे त्याचे कारण होते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच तिचा प्रियकर अरमान कोहलीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मुनमुन आणि अरमानचे प्रेमसंबंध सुरु झाल्यानंतर काहिच दिवसांत ही जोडी ब्रेकअपपर्यंत पोहोचली होती. या ब्रेकअपचे कारण अरमानचा संतप्त आणि आक्रमक स्वभाव असल्याचे म्हटले गेले होते.

प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले!

दोघांमध्ये असे काहीतरी घडले की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अरमानने मुनमुनला खूप मारहाण केली होती. यानंतर मुनमुनने त्याच्या या कृत्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. त्यानंतर अरमानला त्याच्या वागण्याबद्दल माफी मागावी लागली आणि दंडही भरावा लागला होता.

#MeToo दरम्यान समोर आली घटना

मुनमुन दत्ताने काही वर्षांपूर्वी #MeToo मोहिमे दरम्यान तिच्या आयुष्यातील वाईट अनुभव सांगितला होता. ती म्हणाली की, ‘प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि हे सर्व वयोगटात घडते. लहान असताना मला शेजारी राहणाऱ्या काकाची भीती वाटायची. कारण, जेव्हा जेव्हा तो मला एकटा भेटायचा तेव्हा तो मला पकडून ठेवायचा आणि धमकी द्यायचा की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही.’

शालेय जीवनात लैंगिक शोषणाची बळी

यावेळीच ती म्हणाली होती की, ‘वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या एका शिक्षकाने माझ्यासोबत एक वाईट कृत्य केले होते. त्यावेळी त्याचे हे कृत्य माझ्या पालकांना कसे सांगावे, हे मला समजत नव्हते. त्याचवेळीपासून, पुरुषांबद्दल माझ्यात एक विचित्र द्वेष वाढू लागला, कारण मला नेहमी वाटायचे की ते सगळेच दोषी आहेत.’

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Babita Aka Munmun Dutta faced domestic violence)

हेही वाचा :

Father’s Day 2021 : यंदाच्या ‘फादर्स डे’ निमित्ताने बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहा!

Photo : नॉन-फिल्मी स्टाईलमध्ये गौतमनं केलं होतं काजलला प्रपोज, काजल म्हणाली तो बिलकूल फिल्मी नाही…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.