‘ही माझी शेवटची पोस्ट’, तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेत्याने व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत घेतला अखेरचा श्वास
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील अभिनेत्याचं निधन, गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना मोठा धक्का
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत अनेक हिंदी आणि मराठी मावलिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील होळकर यांच्या कुटुंबामध्ये आई, पत्नी आणि दोन मुलं होते. अभिनेत्याच्या निधनामुळे हिंदीसोबतच मराठी कलाविश्वाला देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील होळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुनील होळकर यांना गेल्यावर्षी ‘गोष्ट एका पैठाणीची’ सिनेमासाठी नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक मराठी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सुनील होळकर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अखेर १३ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे चाहते आज सुनील यांच्या आठवणीत असतात.
View this post on Instagram
मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्याला मृत्यूचा भास झाला होता. सुनील यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेवटचा मेसेज मित्रांसाठी पोस्ट केला होता. ‘ही शेवटची पोस्ट आहे. सर्वांचा निरोप घेण्याआधी मिळालेल्या प्रेमाचे आभार मानायचे आहेत. जर काही चूडक झाली असेल तर माफी असावी…’ असं व्हॉट्सअॅप स्टेटस सुनील यांनी ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांसह कुटुंब आणि अनेक सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. वर्षाच्या सुरुवातील सुनील सर्वांना सोडून गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सुनील यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.