Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खऱ्याखुऱ्या आयुष्यात ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’, बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा!

वास्तविक जीवनात, जेठालाल नाही तर, ‘टप्पू’ला ‘बबिता जी’ आवडत असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही काळापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

खऱ्याखुऱ्या आयुष्यात ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’, बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा!
राज आणि मुनमुन
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 11:28 AM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये ‘जेठालाल’ला (Jethalal) ‘बबिता जी’ मनापासून आवडतात. बबिताजींची एक झलक पाहण्यासाठी तो काहीही करू शकतो. शोमध्ये जेठालाल आणि बबिता जी यांची केमिस्ट्री आणि त्यांचे सीन्सपण प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. पण, आता सुरु असणाऱ्या चर्चा ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसणार आहे. खरं तर, वास्तविक जीवनात, जेठालाल नाही तर, ‘टप्पू’ला ‘बबिता जी’ आवडत असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही काळापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ई-टाइम्सच्या अहवालानुसार, बबिता जींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत (Raj Anadkat) दोघेही एकमेकांना खूप पसंत करत असल्याची चर्चा आहे. अनेकवेळा राज मुनमुनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, तिच्या फोटोंवर अशा प्रकारे कमेंट करतो की, हे दर्शवते की दोघेही खूप चांगले आणि एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. पण आता एका वेबसाईटच्या मते, दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही संबंध आहेत.

वेबसाईटनुसार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या प्रत्येक सदस्याला माहित आहे की, दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. एवढेच नाही, तर दोघांच्या कुटुंबीयांनाही याची जाणीव आहे. बातमीनुसार, दोघेही त्यांच्या नात्याचा खूप आदर करतात. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल कोणी काहीही बोलत नाही. दोघांची प्रेमकथा जुनी आहे, पण आजपर्यंत कोणालाही याची माहिती नव्हती.

वयात 9 वर्षांचे अंतर

राज आणि मुनमुन यांच्यात वयाचे 9 वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता राज अनादकतपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तसे, या बातमीवर आतापर्यंत मुनमुन किंवा राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांच्या नात्याचे सत्य जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

ब्रेकनंतर मुनमुन शोमध्ये परतली

मुनमुन बराच काळ शोमधून गायब होती, पण काही दिवसांपूर्वीच ती शोमध्ये परतली. वास्तविक, मुनमुन तिच्या एका व्हिडीओवरून वादात अडकली होती, त्यानंतर तिने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. या वादानंतर, मुनमुन शोमध्ये दिसली नाही, त्यानंतर प्रेक्षकांना वाटले की तिने शो सोडला आहे. परंतु, अलीकडे प्रत्येकजण अभिनेत्री परतल्याने खूप आनंदी आहे.

13 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शोमध्ये मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी ‘टप्पू’चे पात्र अभिनेता भव्य गांधी यांनी साकारले होते. मात्र, 2017 मध्ये भव्यने हा शो सोडल्यानंतर राजने टप्पूची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

Sapna Choudhary : गंभीर अपघातात ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीचा मृत्यू?, जाणून घ्या व्हायरल वृत्तामागचं सत्य

सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.