AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही परमार हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तारक मेहता दुसऱ्यांदा लग्न बंधनात, पत्नीबद्दल म्हणाला

2018 मध्ये टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिच्यासोबत घटस्फोट घेत सचिन श्रॉफने सर्वांनाच मोठा धक्का दिया. विशेष म्हणजे सचिन श्रॉफ आणि जुही परमार या दोघांची एक मुलगी देखील आहे, जिचे नाव समायरा आहे.

जुही परमार हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तारक मेहता दुसऱ्यांदा लग्न बंधनात, पत्नीबद्दल म्हणाला
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:01 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा फेम सचिन श्रॉफ (Sachin Shroff) हा नुकताच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. 25 जानेवारी रोजी यांचा हा विवाहसोहळा मुंबईमध्ये पार पडलाय. सचिन श्रॉफची पत्नी नेमकी काय करते, कुठे असते, तिचे शिक्षण काय असे असंख्य प्रश्न चाहते सातत्याने सचिन श्रॉफ याला विचारताना दिसत होते. मात्र, यावर आता शेवटी सचिन श्रॉफने भाष्य केले आहे. विशेष म्हणजे सचिन श्रॉफ याची पत्नी दिसायला अत्यंत सुंदर असल्याचे लग्नातील फोटोवरून स्पष्ट होतंय. सचिन श्रॉफ याच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे.

2018 मध्ये टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिच्यासोबत घटस्फोट घेत सचिन श्रॉफने सर्वांनाच मोठा धक्का दिया. विशेष म्हणजे सचिन श्रॉफ आणि जुही परमार या दोघांची एक मुलगी देखील आहे, जिचे नाव समायरा आहे. जुही परमार हिच्यासोबत विभक्त होण्याचे कारण अजूनही सचिन श्रॉफ याने सांगितले नाहीये.

सचिन श्रॉफ याने आता त्याची दुसरी पत्नी चांदनी हिच्याबद्दल चाहत्यांना सांगितले असून सचिन श्रॉफ याने चांदनीला आपली सपोर्ट सिस्टम म्हटले. सचिन श्रॉफ म्हणाला की, मी चांदनीसोबत लग्न करून खूप जास्त आनंदी आहे. माझे हे वैवाहिक आयुष्य खूप जास्त चांगले आहे. अजून मी तशी वैवाहिक आयुष्याला चांदनीसोबत सुरूवात केली नाहीये, परंतू मला त्याबद्दल फिल होत आहे.

पुढे सचिन श्रॉफ म्हणाला, माझ्या आणि चांदनीच्या या प्रवास नक्कीच काही आव्हाने येतील. परंतू यामध्ये चांदनी ही माझ्यासोबत असेल आणि आम्ही एकत्र मिळून काम करण्याचे देखील ठरवले आहे. माझ्या आयुष्यात चांदनी आल्याने मी स्वत:ला खूप लकी मानतो आहे. चांदनी माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे.

मुळात म्हणजे सचिन श्रॉफ याची पत्नी चांदनी ही अभिनय क्षेत्राशी संबंधित नाहीये. चांदनी ही व्यवसायाने इव्हेंट आयोजक आणि इंटिरियर डिझायनर आहे. सचिन श्रॉफ हा तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये सध्या तारक मेहताचे पात्र साकारत आहे. तारक मेहता मालिकामध्ये गेल्यापासून सचिन श्रॉफ याची फॅन फाॅलोइंग देखील वाढलीये.

शैलेश लोढा याने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर असित मोदी यांनी तारक मेहताच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफ याला संधी दिली. शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.