Disha Vakani | दिशा वकानी हिची लव्ह स्टोरी खास, पहिल्याच भेटीमध्ये दयाबेन…
टप्पूने देखील मालिका सोडली आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिचा चाहता वर्ग मोठा आहे.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून दयाबेनची वाट पाहात आहेत. दरवेळी आसित मोदी हे प्रेक्षकांना दयाबेन लवकरच मालिकेमध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगतात. मात्र, अजूनही मालिकेमध्ये परत दयाबेन आली नाहीये. टप्पू के पापा टप्पू के पापा हे वाक्य दयाबेनच्या तोंडून ऐकण्यासाठी चाहते आतुर आहेत. दयाबेनसोबतच अनेक कलाकारांनी मालिकेला कायमचा रामराम ठोकलाय. आता मालिकेमध्ये अनेक नवीन कलाकार बघायला मिळतात. अगोदरच्या टप्पूने देखील मालिका सोडली आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिचा चाहता वर्ग मोठा आहे.
दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने २०१५ मध्ये मुंबईमध्ये लग्न केले. त्यानंतर प्रेग्नेंट राहिल्यानंतरही काही काळ दयाबेन मालिकेमध्ये होती. काही दिवसांमध्ये दयाबेन पुनरागमन करणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
दिशा वकानी हिची लव्ह स्टोरी अत्यंत फिल्मी स्टाईल आहे. दिशा वकानी हिला पहिल्यांदा बघितल्यावरच मयूर पाडिया म्हणजेच दिशाचे पती तिच्या प्रेमाममध्ये पडले होते. इतकेच नाहीतर दिशा ही देखील पहिल्याच भेटीमध्ये मयूरच्या प्रेमात पडली होती.
एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि नात्याला थोडासा वेळ देण्यासाठी दिशा आणि मयूर यांनी काही दिवस एकमेकांना डेट करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दिशाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पहिल्या मुलीनंतर दिशाने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. आज दिशा तिचे वैवाहिक आयुष्य आनंदामध्ये जगत आहे. दिशा आणि मयूरची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटातील स्टोरीसारखी नक्कीच आहे.