तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी दुबईमध्ये खरेदी केले तब्बल इतक्या कोटींचे आलिशान घर
या दोघांची ओळख बिग बाॅसच्याच घरात झाली आणि हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची एक चर्चा आहे.
मुंबई : बिग बाॅस 15 जर कोणासाठी लकी ठरले असेल तर ते करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यासाठी. बिग बाॅस 15 कडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, हे बिग बाॅसचे सीजन फ्लाॅप गेले. बिग बाॅसच्या घरात खरी चर्चा होती, ती म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची. या दोघांची ओळख बिग बाॅसच्याच घरात झाली आणि हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची एक चर्चा आहे. या जोडीला चाहते प्रेमाने तेजरन असेही म्हणतात. आता करण आणि तेजस्वीबद्दलची एक मोठी बातमी पुढे येतंय.
तेजस्वी आणि करण नेहमीचसोबत स्पाॅट होतात. इतकेच नाही तर सीरिअल नागिनच्या सेटवर अनेकदा करण तेजस्वीला घ्यायला येतो. रात्री उशीरा दोघे मुंबईमध्ये वडापाव खात फिरतात. चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. इतकेच नव्हे तर लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने यांना विचारला जातो.
लग्नापूर्वी करण आणि तेजस्वी यांनी मोठी प्रॉपर्टी खरेदी केलीये. विशेष म्हणजे ही प्रॉपर्टी यांनी भारतामध्ये नव्हे तर चक्क विदेशात खरेदी केली आहे. बिग बाॅसच्या घराबाहेर आल्यावर तेजस्वी आणि करणला सातत्याने काम मिळत असून यांनी बक्कळ पैसा कमावला आहे.
काही दिवसांपूर्वीच तेजस्वीने गोव्याला स्वत: चे घर घेतले आहे. तर करण कुंद्राने देखील मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले. बिग बाॅसच्या घराबाहेर आल्यापासून दोघे ऐकमेकांना डेट करत आहेत. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
करण कुंद्रा आणि तेजस्वी यांनी दुबईला आलिशान 1 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये इनडोअर पूल देखील आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटींच्या आसपास आहे. तेजस्वी सध्या नागिन मालिकेसोबतच एका मराठी चित्रपटासाठी काम करत आहे.