‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद, तरूणाईला समजतंय एकत्र कुटुंबाचं महत्त्व!

विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही, तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद, तरूणाईला समजतंय एकत्र कुटुंबाचं महत्त्व!
Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 2:12 PM

मुंबई : झी मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे ‘राणा दा’. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आता ‘सिद्धार्थ देशमुख’ या नव्या व्यक्तिरेखेसह ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली, तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे.

विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही, तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे.

प्रेक्षकांना भावतेय मालिका!

नुकतंच मालिकेत ऐश्वर्या म्हणजेच देशमुख घरातील म्हशीचं बाळंतपण प्रेक्षकांनी पाहिलं. ऐश्वर्या बाळंत होणार, म्हणून घरातील सगळेचजण काळजीत असतात. प्रत्येकाची सुरु असलेली धावपळ बघून ऐश्वर्या म्हैस आहे की, मुलगी यात अदितीचा गोंधळ होतो. दिवसाअंती म्हैस व्हायते आणि सगळे टेन्शन फ्री होतात. त्यामुळे देशमुख कुटुंब हे फक्त माणसांपुरती मर्यादित नसून, त्या घरातील पशु-पक्षी देखील त्यांचं कुटुंबच आहे, असं सिद्धार्थ अदितीला सांगतो. हा प्रसंग अगदी मनाला भावणारा होता. मालिकेतील याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. सिद्धार्थ आणि अदिती सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतेय.

तरूणाईला समजतंय एकत्र कुटुंबाचं महत्त्व!

प्रेक्षकांचा मालिकेला मिळणार उत्फुर्त प्रतिसाद बघून अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. त्यांची उस्फुर्त प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पावती आहे. या मालिकेसारखं वातावरण खूप कमी बघायला मिळतं. अदितीला माणसांबद्दल भीती असणं हा गुण वास्तवातही कुठे ना कुठे पहायला मिळतो. माणसं आपल्या आपल्यातच इतकी रमतात की, छोट्या कुटुंबातही त्यांचं एकमेकांकडं लक्ष नसतं. एकमेकांशी कम्युनिकेशनच नसतं. मोठ्या कुटुंबात न राहून आपण नक्की काय मिस करतोय, हे आजच्या जनरेशनला या मालिकेच्या माध्यमातून समजतंय. मोबाईल आणि कॅाम्प्युटरच्या पलिकडे जाऊन माणसांचंही एक जग असतं हे युथला समजतंय. त्यात काय सुख असतं हे प्रेक्षकांना जाणवतंय.”

अमृता पवार मुख्य भूमिकेत!

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारतेय, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

हार्दिक जोशीचं कमबॅक

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला आणि त्यात हार्दिक जोशी सकारात असलेल्या ‘राणा दा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ही मालिका बंद झाल्यानंतरही चाहते त्यातील कलाकारांच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच हार्दिक जोशीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदित झाले आहेत.

हेही वाचा :

Shilpa Shetty | राज कुंद्रासोबतच्या नात्यावर शिल्पा शेट्टी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सोशल मीडियावर पोस्ट करत दिला संकेत…

Bharti Singh Channel : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह चाहत्यांच्या भेटीला आणणार नवे चॅनेल, पाहा काय असणार नाव?

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.