Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा, कुंडीत वडाचं झाड लावत दिला पर्यावरण रक्षणाचा धडा
‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला आहे मात्र निराळ्या पद्धतीनं तो साजरा करण्यात आला. मालिकेच्या टीमनं कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. (The unique Vatpoornima on the set of the series 'Aai Kuthe Kay Karte', a lesson for environmental protection)
मुंबई : वरुणराजाचं आगमन झालं की स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा या सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश मानला जातो. हा सण नेहमीच आपल्याला निसर्गाच्या जवळ येण्यासाठी भाग पाडतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा
या सणाचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे वडाचं झाड ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगी आहे असं म्हटलं जातं. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व चांगलंच पटलेलं आहे. त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणाला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या पुजनाला प्रचंड मोठं महत्त्व आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला आहे मात्र निराळ्या पद्धतीनं तो साजरा करण्यात आला. मालिकेच्या टीमनं कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं.
नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्त्व संजनाला पटवून देणार अरुंधती
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे. संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरी अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे. अरुंधती आपल्या कृतीतून नेहमीच नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असते. त्यामुळे या वटपौर्णिमेच्या सणादिवशीही नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्त्व ती संजनाला पटवून देणार आहे. याशिवाय अंकिताचीही पहिलीच वटपौर्णिमा आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात वटपौर्णिमेच्या सणाची लगबग पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ फक्त स्टार प्रवाहवर.
संबंधित बातम्या