Satyavan Savitri: ‘सत्यवान सावित्री’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार सावित्रीची भूमिका

| Updated on: Jun 02, 2022 | 7:41 AM

सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं.

Satyavan Savitri: सत्यवान सावित्री मालिकेत ही अभिनेत्री साकारणार सावित्रीची भूमिका
satyavan savitri
Image Credit source: Tv9
Follow us on

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची (Savitri) गोष्ट प्रेक्षकांना झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता पहायला मिळणार आहे. सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. या मालिकेचे प्रोमोज नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या मालिकेत सावित्रीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील प्रेक्षकांना नुकतंच वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या प्रोमोज मधून मिळालं. (Marathi Serial)

या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी ही सावित्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सावित्रीची बालपणापासूनची कथा दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत बालपणीच्या सावित्रीची भूमिका राधा धरणे साकारणार असून वेदांगी या मालिकेत तरुणपणीच्या सावित्रीची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसेल. वेदांगीने याआधी अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या असून ती एक नृत्यांगना देखील आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमामधून वेदांगी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

या मालिकेबद्दल बोलताना वेदांगी म्हणाली, “ही मालिका म्हणजे गोष्ट आहे यमाकडून सत्यवानाचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची आणि ती प्रमुख भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला खूप आनंद आहे. सावित्रीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पण तिचा जीवनप्रवास नाही माहिती. ही मालिका खूपच भव्य दिव्य रूपात तिचा जीवन प्रवास प्रेक्षकांना दाखवेल. प्रेक्षकांना ही कथा पाहायला खूप आवडेल याची मला खात्री आहे.”