Uorfi Javed | उर्फी जावेद हिची अतरंगी स्टाईल, चक्क ‘ब्रा’ऐवजी, चाहते हैराण

उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळाली आहे. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिची अतरंगी स्टाईल, चक्क 'ब्रा'ऐवजी, चाहते हैराण
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 7:12 PM

मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला अनेकदा तिच्या कपड्यांवरून सुनावले जाते. इतकेच नाहीतर अतरंगी कपड्यांमुळे उर्फीला यापूर्वी अनेक वेळा थेट जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. मात्र, असे असले तरीही उर्फीला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. विशेष म्हणजे उर्फीला तिच्या कपड्यांवरून टार्गेट करणाऱ्या लोकांना ती सडेतोड उत्तर देते. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईमध्येच राहते. आतापर्यंतच्या करिअरमध्ये उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. परंतू उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळाली आहे. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

उर्फी जावेद आता परत एकदा तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत आलीये. यावेळी तर उर्फीचे कपडे पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. उर्फीच्या या नव्या आणि हटक्या स्टाईलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने काळ्या रंगाचे स्कर्ट घातले असून काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. मात्र, बिकिनीवर तिने आईस्क्रीम कोन तयार केले असल्याने तिला ट्रोल केले जात आहे.

उर्फी जावेद हिची ही स्टाईल अनेकांच्या पचनी पडली नाहीये. सोशल मीडियावर कमेंट करत लोक तिला ट्रोल करत आहेत. अनेकांनी म्हटले की, स्टाईलसाठी आणि प्रसिध्दीमध्ये राहण्यासाठी ही उर्फी कधी काय करेल हे सांगणे अवघड आहे.

एका युजर्सने उर्फीच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मला उर्फीचा हा लूक पाहून चक्करच येत आहे. दुसऱ्याने लिहिले की, लोक उर्फी जावेद हिच्या स्टाईलवर जळतात.

उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी उर्फीला टार्गेट केले होते. इतकेच नाहीतर चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद हिला जिथे भेटेल तिथे चोपून काढण्याची भाषा केली होती. मात्र, उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते.

उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर उर्फीच्या तक्रारीनंतर याला पोलिसांनी बिहारमधून अटकही केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.